Snake bite 
महाराष्ट्र

झोपेत सापाचा दंश..तीन वर्षीय बालिकेचा काही क्षणातच मृत्‍यू

झोपेत सापाचा दंश..तीन वर्षीय बालिकेचा काही क्षणातच मृत्‍यू

Rajesh Sonwane

पाल (जळगाव) : रात्री घरात झोपेलेले असताना कोबरा जातीचा साप चावल्याने तीन वर्षीय बालिकेचा करूण अंत झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास पाल येथे घडली. मागील काही महिन्‍यात अशा प्रकारची एकाच परिसरातील ही चौथी घटना असल्‍याचे बोलले जात आहे. (jalgaon-news-pal-aria-morning-sleep-snake-bite-and-three-year-girl-death)

सातपुडा पायथ्‍याशी जंगल परिसरात पाल हे ठिकाण आहे. येथील वस्‍ती कमी आहे. मात्र जंगल परिसर असल्‍याने या भागात जंगली हिंस्‍त्र प्राणी, साप नेहमी फिरत असतात. अशात पहाटे परिवारासोबत झोपलेल्‍या चिमुकलीला कोबरा जातीच्‍या सापाने दंश केला. यात तिचा मृत्‍यू झाला. भावना गणेश जाधव (वय ३) असे या बालिकेचे नाव आहे.

आजीच्‍या मांडीवरच सोडले प्राण

पहाटेच्‍या सुमरास झोपेतच कोबरा जातीच्या सर्पाने भावना हिच्‍या हाताच्या बोटाला दंश केला. काहीतरी चावल्‍याचे तिला जाणवले असताना तिला जाग आली. रडायला लागल्‍याने परिवाराला देखील जाग आली. यानंतर परिवाराच्‍या लक्षात आल्‍याने तिला जवळ घेतले. आजीने तिला मांडली घेतले असता सर्प दंश झाल्‍यांतर काही मिनिटातच बालिकेने आजीच्या माडींवर प्राण सोडले. रात्री तीनच्‍या सुमारास घटना घडली असून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

परिसरातील चौथी घटना

पाल येथील चैतन्यनगर परिसरात चौथी घटना मागील काही वर्षात या नगरमध्ये रहिवासी असलेल्या एक पुरुष, एक मुलगी आणि एक मुलगा असे चार जणांना घरातच कोब्रा जातीच्या सर्प दंश झाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT