corona vaccination 
महाराष्ट्र

Jalgaon : साडेतीन लाखाच्‍यावर मुलांना होणार लसीकरण

साडेतीन लाखाच्‍यावर मुलांना होणार लसीकरण

Rajesh Sonwane

जळगाव : कोरोना संसर्ग तसेच ओमिक्रॉनचा वाढता प्रसार रोखण्यासाठी १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्‍यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू करत ३ जानेवारीपासून सध्‍याच्‍या लसीकरण केंद्रावरच मुलांना लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटांतील साडेतीन लाखाच्‍यावर मुलांची संख्या आहे. (Jalgaon-news-Over-three-and-a-half-lakh-children-will-be-vaccinated)

कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन व्‍हेरीयंटच्‍या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी हालचाल सुरू झाल्‍या आहेत. राज्‍यात ओमिक्रॉनचे रूग्‍ण आढळून वाढत आहे. याला रोखण्यासाठी लसीकरण गरजेचे असल्याने केंद्र व राज्य सरकारने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मागील वर्षभरापूर्वी सुरू झालेल्‍या लसीकरणात (Corona Vaccination) आतापर्यंत १८ वर्षांवरील बहुतांश नागरिकांनी लस घेतली आहे. आता १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरणाचे नियोजन केंद्र शासनाकडून केले जात आहे. याची अंमलबजावणी 3 जानेवारीपासून केली जात आहे. त्‍यानुसार जिल्हा प्रशासनाकडून १५ ते १८ वर्षांमधील मुलांची संख्येनुसार लसीकरणाचे नियोजन केले जाणार आहे.

दोन लाख लस उपलब्‍ध

कोरोना (Corona) संसर्ग झपाट्याने वाढत असून तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्यामुळे मुलांचेही लसीकरण करण्याचे नियोजन आहे. जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यात या वयोगटातील सुमारे साडेतीन लाखांपेक्षा अधिक मुलांची संख्या आहे. त्‍यांच्‍या लसीकरणाचे नियोजन केले असून, या मुलांसाठी दोन लाख डोस उपलब्‍ध आहेत. यात १८ वर्षावरील अनेकांचा पहिला व दुसरा डोस बाकी आहे. यामुळे दोन लाख लसींचा स्‍टॉक जिल्‍ह्यासाठी अपुर्ण असून अतिरिक्‍त लसींची मागणी केली जाणार असल्‍याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लसीकरण केंद्र असणार तेच

१५ वर्षांवरील मुलांना लस देण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाची तयारी सुरू आहे. याकरीता जिल्‍ह्यात सद्यःस्थितीत सुरू असलेल्‍या लसीकरण केंद्रांवरच मुलांना लसीकरण केले जाणार आहे.

ज्‍येष्‍ठांना १० जानेवारीपासून डोस

कोरोना लसीकरणात पहिल्‍या टप्‍यात ज्‍येष्‍ठ नागरिक व फ्रंटलाईन वर्करांना डोस दिला होता. त्‍यानुसार आता तिसरा डोस अर्थात प्रोटेक्‍शन डोस देखील ज्‍येष्‍ठ नागरिक व फ्रंटलाईन वर्करला दिला जाणार आहे. याबाबत जिल्‍हा प्रशासनाला शासनाच्‍या कोणत्‍याच सूचना नाहीत. परंतु, जिल्‍ह्यात हा प्रोटेक्‍शन डोस देण्याची सुरवात १० जानेवारीपासून केली जाणार आहे. यात दहा लाखापर्यंत ज्‍येष्‍ठ नागरिक व १ लाख ७४ हजार फ्रंटलाईन वर्कर आहेत.

केंद्र शासनाच्‍या निर्देशानुसार १ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील साडेतीन लाख मुलांना लसीकरण केले जाणार आहे. जिल्‍ह्यासाठी प्राप्‍त लसीचा साठा दोन लाख असून अतिरिक्‍त लसीची मागणी केली जाणार आहे.

– डॉ. नागोराव चव्‍हाण, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT