Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : रस्त्याने जाताना झाला घात; मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Jalgaon News : बिडगाव येथे ते पत्नी, २ मुले व २ मुली यांच्यासह वास्तव्यास होते. गावात मिळेल ते मोलमजुरीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. तर काही काळापुरता जोरदार वारा देखील होता. या वर व पावसामुळे रस्त्यावर विद्युत तर तुटून पडली होती. या तुटलेल्या वायरला स्पर्श झाल्याने एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे घडली आहे.

चोपडा (Chopda) तालुक्यातील बिडगाव येथील लतीफ इकबाल तडवी (वय ५५) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बिडगाव येथे ते पत्नी, २ मुले व २ मुली यांच्यासह वास्तव्यास होते. गावात मिळेल ते मोलमजुरीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान पाऊस सुरु असल्याने ते घरीच होते. तर सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते शौचास जात असताना रस्त्यात पडलेल्या वायरचा त्यांचा स्पर्श झाला. यात त्यांना विजेचा जोरदार झटका (Electric Shock) बसून दूर फेकले गेले. 

कुटुंबीयांचा आक्रोश 

घडलेला प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर लतीफ तडवी यांना लागलीच जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. परिवारातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांना धक्का बसला असून मृत्यूची बातमी एकटाच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT