Eknath Khadse Latest Marathi News, Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

एकनाथ खडसे तातडीने मुंबईला; जळगावातील सर्व कार्यक्रम केले रद्द

एकनाथ खडसे तातडीने मुंबईला; जळगावातील सर्व कार्यक्रम केले रद्द

संजय महाजन

जळगाव : विधान परिषदेच्‍या निवडणूकीनंतर राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे मंगळवारी मुक्‍ताईनगर येथे आले होते. परंतु, राज्‍यात सुरू असलेल्‍या राजकिय हालचालींनंतर आज सकाळी खडसे तातडीने मुंबईला (Mumbai) रवाना झाले आहेत. (ncp leader Eknath Khadse rushed to Mumbai All program canceled in Jalgaon)

विधान परिषदेच्‍या निवडणूकीत राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) विजयी झाले. यानंतर (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जळगावात खडसेंचा जंगी सत्कार करण्याचे नियोजन केले होते. परंतु, राज्यात झालेल्‍या राजकिय भुकंपाने ठाकरे सरकार अस्थिर झाले आहे. यामुळे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार ठिकते की नाही? यावर प्रश्‍न चिन्‍ह निर्माण झाले आहे. यामुळे खडसेंनी जळगावातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. (Eknath Khadse Latest Marathi News)

मुंबईत बैठकीसाठी रवाना

राज्‍यातील सध्‍याच्‍या घडामोडीत आज मुंबईत राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने बैठक बोलावली आहे. उपमुख्‍यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वांना उपस्‍थीत राहण्याचे आदेश कालच काढले आहेत. मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश असल्याचे खडसेंनी सांगितले आहे. यामुळे जळगावातील सत्काराचे कार्यक्रम रद्द करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaishno Devi Temple : वैष्णो देवीचे दागिने चोरी; आमणापूरच्या मंदिरात चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

kumbha And Tula Rashi : करिअरपासून ते बिजनेसपर्यंत कसा जाणार कुंभ आणि तूळ राशीचा आजचा दिवस?

JioPC भारतात लाँच, आता कोणताही टीव्ही बनणार तुमचा कम्प्यूटर, कमी किमतीत भन्नाट सुविधा

Palghar Shocking : काकूनेच रचला पुतण्याच्या हत्येचा कट, १ लाखांची सुपारी दिली, एक चूक केली अन् भंडाफोड झाला

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

SCROLL FOR NEXT