Jalgaon BJP saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: नाना पटोलेंची नैतिकता हरपली : आमदार भोळे; भाजपतर्फे जळगावात पुतळा दहन

नाना पटोलेंची नैतिकता हरपली ः आमदार भोळे; भाजपतर्फे जळगावात पुतळा दहन

संजय महाजन

जळगाव : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नैतिकता हरपली असल्‍यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याबाबत बेताल वक्तव्य केले आहे. यांचा निषेध करत त्यांना आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांनी दिला. (jalgaon news Nana Patole statue burns BJP in Jalgaon)

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या विरोधात भाजप आक्रमक झाले असून राज्‍यभरात आंदोलन करत गुन्‍हा दाखलची मागणी केली जात आहे. त्‍यानुसारन जळगाव भाजपतर्फे (BJP) आज आंदोलन करण्यात आले.

टॉवर चौकात जाळला पुतळा

कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन केलेल्या टिकेचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे टॉवर चौकत आंदोलन करण्यात आले. यात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, अजय भोळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadgola Benefits: कडाक्याच्या उन्हात ताडगोळे खाल्याने कोणकोणते फायदे होतात, ही माहिती एकदा वाचाच

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT