मुक्ताईनगर : आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर येथील महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची मानल्या जाणारी आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी उद्या (3 जून) आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे (Pandharpur) निघणार आहे. संस्थानच्यावतीने जय्यत तयारी सोहळ्यानिमित्त सुरू झाली आहे. पालखीची रंगरंगोटी व वारकरी पोशाख विविध कामे सुरू झाले आहे. (jalgaon news Muktai Palkhi Rath will be on its way to Pandharpur aashadhi wari)
कोरोनाच्या (Corona) तब्बल दोन वर्षाच्या कालखंडानंतर मुक्ताई पालखीचा (Muktai Palkhi) रथ पंढरपूरला निघणार आहे. दोन वर्षापासून रथ जागेवरच थांबलेला होता. गतवर्षी आषाढीनिमित्त पालखी बसने मार्गस्थ झाली होती. मात्र, यावर्षी पायी वारी (Aashadhi Wari) सोहळा असल्याने मुक्ताबाई संस्थांच्यावतीने रथाची व पालखीची रंगरंगोटी या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.