Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: नववर्षाची पहाट तिच्‍यासाठी ठरली अंधाराची; मुलाला उठवायला गेलेल्या आईला दिसला मृतदेह

नववर्षाची पहाट तिच्‍यासाठी ठरली अंधाराची; मुलाला उठवायला गेलेल्या आईला दिसला मृतदेह

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील तांबापुरा भिलाटी परिसरातील १९ वर्षीय तरुणाने मध्यरात्रीनंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. १) वर्षाचा पहिला दिवस उजाडल्यावर मुलाला उठवायला खोलीत (Jalgaon) गेलेल्या आईला गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलगा दिसताच तिने एकच हंबरडा फोडत आक्रोश केला. (Letest Marathi News)

मनोहर कैलास गायकवाड (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोहर गायकवाड तांबापुरा परिसरात आई-वडील आणि लहान भावासोबत वास्तव्याला होता. मिळेल ते काम करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. ३१ डिसेंबरला रात्री अकराला मनोहर जेवण करून घराच्या मागच्या खोलीत झोपायला गेला. मध्यरात्री त्याने दोरीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.

रविवारी (ता. १) सकाळी आठपूर्वी आई राधाबाई मनोहरला उठविण्यासाठी हाका मारत होत्या. तो प्रतिसाद देत नसल्याने त्या खोलीत गेल्या. तेथे लटकलेल्या अवस्थेत मनोहरचा मृतदेह पाहून राधाबाई यांनी आक्रोश करत हंबरडा फोडला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना (Police) देण्यात आली. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक नितीन पाटील, तुषार गिरासे तपास करीत आहेत.

प्रेमप्रकरणातूनच टोकाचे पाऊल?

दरम्यान, मनोहर गायकवाड काही दिवसांपासून एमआयडीसीतील एका कारखान्यातही रोजंदारीवर जात होता. व्हॉटस्‌ॲप-फेसबुकवर नवे स्टाईलीश फोटो टाकून कमेंट मिळवणे, मित्रांच्या चर्चेत राहायला त्याला आवडत असे. नेहमी आनंदी, उत्साही असणारा मन्या सहजासहजी, असे पाऊल उचलणारच नाही, असा त्याच्या ओळखीच्या तरुणांना विश्वास आहे. प्रेमप्रकरणातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असाही संशय व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका

Grooming Tips For Men: दाढी करण्यासाठी गंजलेला किंवा जुना रेझर वापरण्याचे गंभीर धोके, पुरूषांनी वेळीच घ्या काळजी

Mumbai News: मुंबईतील शिंदेसेनेच्या बड्या नेत्याच्या जीवाला धोका, घर अन् ऑफिसची ३ वेळा रेकी; सलमान खानसोबत जवळचे संबंध

Diwali Ladoo Recipe : रव्याचे लाडू कडक होतात? 'या' सोप्या ट्रिकने बनवा मऊसूत लाडू, तोंडात टाकताच विरघळतील

Shocking : संभाजीनगर हादरले! बाप लेकाची मध्यरात्री निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा

SCROLL FOR NEXT