Suicide Saam tv
महाराष्ट्र

पतीने विषारी द्रव घेतल्‍याचा धक्‍का; दोन चिमुकल्‍यांसह आईची आत्‍महत्‍या

पतीने विषारी द्रव घेतल्‍याचा धक्‍का; दोन चिमुकल्‍यांसह महिलेची आत्‍महत्‍या

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

जळगाव : बीडगाव (ता. चोपडा) येथील विवाहितने दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. सकाळी तिघांचे मृतदेह विहिरीतून काढून चोपडा उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले आहे. (Jalgaon news Mother suicide with two small girl)

चोपडा तालुक्यातील बीडगाव येथील विनोद विक्रम बाविस्कर (वय ४०) हे पत्‍नी वर्षा विनोद बाविस्कर (वय ३५), मुलगी खुशी व किर्ती, मोनाली बाविस्कर यांच्यासह वास्तव्याला आहे. बुधवारी (२ मार्च) रात्री विनोद याचे आई– वडील आणि भाऊ यांच्याशी पैशांच्या देवाणघेवाण यावरून वादविवाद झाला. यात संतापाच्या भरात विनोद बाविस्कर याने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

अन्‌ महिलेची मुलींसह विहिरीत उडी

पतीने विषारी औषध घेतल्याचा पत्नी वर्षा बाविस्कर हिला प्रचंड धक्का बसला. या घटनेचा कोणताही विचार न करता वर्षा हिने दोन्ही मुली किर्ती आणि मोनाली यांना सोबत घेतले. बीडगाव शिवारातील गट क्रमांक २३४ मधील इकबाल शहादूर तडवी यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सुदैवाने मोठी मुलगी खुशी ही मामाच्या घरी गेली असल्याने ती या घटनेपासून दूर राहील्याने बचावली आहे. तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती गावातील पोलीस पाटील रामकृष्ण पाटील यांनी अडावद पोलीस ठाण्यात दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

Spruha Joshi Photos: कानात झुमके, कपाळी बिंदी अत्यंत सुंदर दिसतेय मराठमोळी अभिनेत्री

Home Vastu Tips: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण वाहतूक कोंडी; २-३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT