school open 
महाराष्ट्र

प्राथमिक शाळांमध्‍ये पुन्‍हा किलबिलाट; जळगावातील अडीच हजारांहून शाळा आजपासून सुरू

प्राथमिक शाळांमध्‍ये पुन्‍हा किलबिलाट; जळगावातील अडीच हजारांहून शाळा आजपासून सुरू

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्‍या एकूण २ हजार ५६३ शाळा आजपासून (ता. १) सुरू होत आहेत. यामुळे प्राथमिक शाळांमध्‍ये गेल्‍या दोन वर्षांपासून बंद असलेला किलबिलाट पुन्‍हा तब्बल एकदा ऐकण्यास मिळणार आहे.

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्‍या. यानंतर आता ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास मान्‍यता दिली आहे. राज्य सरकारने याबाबत निर्णय घेत १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार आहेत. परंतु, मुलांना पाठविण्यासंदर्भात पालकांचे संमतिपत्र बंधनकारक आहे.

शाळांमध्‍ये सॅनिटायझेशन

ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग बुधवारपासून सुरू होणार आहे़. या अनुषंगाने बहुतांश शाळांनी वर्ग खोल्‍यांचे सॅनिटायझेशन पूर्ण केले आहे. तर काही शाळांमध्ये साफसफाई, स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू होती. दोन वर्षानंतर प्राथमिकच्‍या शाळा सुरू होत असल्‍याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्‍या आहेत. वर्गांमध्‍ये चिमुकल्‍यांचा उडणारा गोंधळदेखील आता सुरू होणार आहे.

एक दिवसाआड वर्ग

कोरोनाच्‍या नवीन प्रकाराच्या अनुषंगाने सावधानता म्‍हणून काही नियमावली आखून दिली आहे. त्‍या दृष्‍टीने शाळांनी नियोजन केले आहे. तर काही शाळांनी विद्यार्थ्यांना एक दिवसाआड बोलविण्याचे नियोजन केले आहे. अर्थात हजेरीपटानुसार पहिल्‍या वीस क्रमांकाचे विद्यार्थींसाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार तर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी मंगळवार, गुरूवार व शनिवार असे दिवस ठरवून दिले आहे.

३ लाख १,६६५ विद्यार्थी

जळगाव जिल्ह्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या २ हजार ५६३ शाळा असून यात ३ लाख १ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशीत आहेत. त्यामध्ये इयत्ता पहिलीचे ६८ हजार ९७१ तर दुसरीचे ७५ हजार ८६९ तसेच तिसरीचे ७९ हजार १३७ व चौथीच्या वर्गात ७७ हजार ६८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

नाशिक हादरलं! छेडछाडीचा जाब विचारला म्हणून पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; १५ किमी पाठलाग करून...

Besan Ladoo Racipe: घरच्या घरी बनवा तोंडात विरघळणारा स्वादिष्ट बेसन लाडू; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT