ShivSena Political Crisis News, Jalgaon Latest Marathi News Saam tv
महाराष्ट्र

शिंदेच्‍या गटात जळगावातील आमदार; जिल्‍ह्यातील शिवसेनेत फुट

शिंदेच्‍या गटात जळगावातील आमदार; जिल्‍ह्यातील शिवसेनेत फुट

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केले आहे. त्यात खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील व (Pachora) पाचोरा येथील किशोर पाटील, चोपड्याचे आमदार लता सोनवणे देखील आहेत. हे आमदार नॉट रिचेबल असल्याने त्यांनी बंड केल्याची चर्चा आहे. (jalgaon news MLAs from jalgaon district in eknath Shinde group)

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचे काका (स्व.) आर. ओ. तात्या पाटील हे कट्टर शिवसेना (Shiv Sena) आमदार होते. त्यावेळी किशोर पाटील हे पोलिस कॉन्टेबल होते. मात्र आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांनी आपली आमदारकीची जागा किशोर पाटील यांना दिली होती. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वावर आमदारकीची छाप पाडली. जिल्हा बँकेतही ते उपाध्यक्ष होते. पाचोरा पालिकाही किशोर पाटील यांच्या (Jalgaon News) ताब्यात आहे. पाटील हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ते त्यांच्या समवेत बंडात असल्याचे सांगण्यात येत आहे. (Jalgaon Latest Marathi News)

पाटील मंत्रीपदाचे दावेदार

चिमणराव पाटील पारोळा येथील शिवसेना आमदार आहेत. ज्येष्ठ आमदार असल्याने मंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे मंत्री झाल्याने त्यांची संधी हुकल्याने ते नाराज होते. अनेक वेळा शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी त्यांचे वादही झाले. त्यामुळेच ते फुटले असावे अशी चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार केले जाहीर

BMC News : सिंगल-यूज प्लास्टिकवर १००% बंदी, नियम तोडणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई, मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडवर

Skin Care Drink: महागड्या स्किन केअरपेक्षा आठवड्यातून ४ दिवस प्या 'हे' होममेड ड्रिंक; मिळेल सॉफ्ट आणि ग्लॉईंग स्किन

थांबायचं नाही! ठाकरे बंधूंना भाजपकडून जबरदस्त धक्का, बड्या नेत्यांनी धरली भाजपची वाट

५ महिला आणि २ बालके सहस्रकुंड धबधब्यात अडकले; पाहा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT