Gulabrao Patil Sanjay Raut Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil: राऊत दात काढलेला वाघ आहे का; मंत्री गुलाबराव पाटलांची राऊतांवर खोचक टीका

राऊत दात काढलेला वाघ आहे का; मंत्री गुलाबराव पाटलांची राऊतांवर खोचक टीका

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : स्वतः ला वाघ म्हणणारे धमकीला काय घाबरता? मी वाघ आहे, मी वाघ आहे असं संजय राऊत नेहमी म्हणतात. मग दात काढलेला वाघ आहे काय? अशी खोचक टीका (Gulabrao Patil) मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) केली आहे. (Letest Marathi News)

जळगाव जिल्हा परिषदेत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधताना प्रतिक्रीया दिली. गुलाबराव पाटील म्हणाले, की आठ महिन्यांनी साक्षात्कार झाला असेल; तर मला माहिती नाही. आता सात ते आठ महिने झाले, त्यामुळे त्या गोष्टीला महत्त्व नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन २१० दिवस झाले आहेत. त्यामुळे त्या गोष्टीला महत्त्व नाही, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जनता आता गद्दार..गद्दारला कंटाळली

एकवेळ पिक्चर लागून सात महिने झाल्यानंतर त्याला महत्त्व नसते. गद्दार गद्दार हे ऐकून लोकही आता कंटाळले आहेत. तुम्हाला काय मिळालंय, नाही मिळालंय, लोकांनी काय गद्दारी केली हे आता सगळं संपलंय. त्यांनी आता नवीन उभारीने पक्ष बांधला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आगामी निवडणुकीत तुम्ही तुमचे लोक निवडून आणा, आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करू. आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करा, असं थेट आव्हान देखील गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT