Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : रात्री सोबत जेवण करून सारे झोपले; मध्यरात्री विवाहितेचे धक्कादायक पाऊल

Jalgaon News : पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आल्यानंतर पटीने एकच आक्रोश केला. महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

Rajesh Sonwane

जळगाव : रात्री घरात सर्वांसोबत गप्पा करत सोबत जेवण देखील केले. जेवण आटोपल्यानंतर परिवारातील सर्वजण झोपले. यानंतर विवाहितेने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना (Jalgaon) जळगाव तालुक्यातील किनोद येथे घडली असून तालुका (Police) पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

किनोद (ता.जळगाव) अश्विनी विशाल चौधरी (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे पती विशाल हे जळगावात खाजगी क्षेत्रात काम करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान ३० डिसेंबरला पहाटे तीन वाजता सदरची घटना उघडकीस आली. २९ डिसेंबरला घरातील सर्व जणांनी सोबत जेवण केले. यानंतर चौधरी कुटुंबीय झोपले. शनिवारी मध्यरात्रीनंतर विवाहितेने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे ३ वाजता पती पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांनी पत्नीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आल्यानंतर पटीने एकच आक्रोश केला. महिलेला (Jalgaon Medical Collage) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. विवाहितेच्या पश्चात पती, दीड वर्षाचा मुलगा आहे. यावेळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT