Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: पैशांसाठी काहीही..विवाहित असूनही अविवाहित असल्‍याचे दाखवत लावला विवाह

पैशांसाठी काहीही..विवाहित असूनही अविवाहित असल्‍याचे दाखवत लावला विवाह

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : विवाहित महिलेला ती अविवाहित आहे; असे खोटे भासवून तिचा तरुणासोबत न्यायालयात (Marriage) विवाह लावून दिला. तसेच तरुणाकडून एक लाख रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी येथील (Police) पोलिसात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

शहापूर (जि. बऱ्हाणपूर) योगेश संतोष महाजन (वय २५) याचा विवाह जया (खरे नाव निकिता) हिच्याशी (Jalgaon) लावून देण्यासाठी त्याच्याकडून संशयित आशाबाई ठाकरे व इतरांनी एक लाख रुपये घेतले. जया ही विवाहित असतानाही ती अविवाहित असल्याचे खोटे भासवले. फिर्यादी योगेश महाजनचा विश्वास संपादन करून त्याचा भुसावळ (Bhusawal) न्यायालयात जयासोबत विवाह लावून दिला. जिच्याशी आपले लग्न झाले, ती अगोरदच विवाहित असल्याचे फिर्यादी योगेशच्या लक्षात आले.

चौघांच्या विरोधात गुन्हा

आपला विश्‍वासघात करुन फसवणूक केल्याप्रकरणी त्याने शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन संशयित अतुल गुर्जर (रा. रसलपूर, ता. रावेर), आशाबाई भगवान ठाकरे (रा. कंडारी, ता. भुसावळ), विठ्ठल श्यामराव काकडे (रा. पळशी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद), निकिता पिता सुधाकर सोंळके (रा. कानोली, ता. दर्यापूर, जि. अमरावती) या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना रविवारी (ता. १८) अटक करण्यात आली असून इतरांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, सध्या विवाहोच्छूक मुलांना मुली मिळणे कठीण झाल्यामुळे त्यांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारची फसवणूक करणारे एजंट चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! आरसीबीच्या खेळाडूंचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT