Bank Robbery 
महाराष्ट्र

धक्‍कादायक..कर्मचाऱ्यांनीच फोडली बँक; तारण ठेवलेले दोन कोटींचे दागिने लंपास

धक्‍कादायक..कर्मचाऱ्यांनीच फोडली बँक; तारण ठेवलेले दोन कोटींचे दागिने लंपास

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : आमडदे (ता. भडगाव) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली. यात बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणात बँक मॅनेजरचा हात असल्‍याचा संशय पोलिसांकडून व्‍यक्‍त केला जात आहे. सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त मूल्याचे दागिने लंपास करण्याचा डाव पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये पर्दाफाश करत उघडकीस आणली आहे. (jalgaon-news-maharashtra-rural-bank-bhadgaon-branch-Employees-broke-the-bank-two-crore-jewelery-pledged)

भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी व ग्राहकांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी भेट देत पोलीस अधिकारी यांना पुढील तपासाबाबत सुचना केल्या आहेत. जळगाव येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणात नेमके किती रूपयांचे दागिने चोरण्यात आले; याची माहिती स्‍पष्‍ट झालेली नाही. मात्र सदर आकडा दोन ते तीन कोटी रूपयांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रात्रीच गावात पसरली चोरीची बातमी

आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा असुन येथे मॅनेजरसह तीन कर्मचारी कार्यरत आहे. सोमवारी (२२ नोव्‍हेंबर) रात्री १ ते २.३० वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी झाल्याची माहिती गावात पसरली. चोरी झाल्याची माहिती कर्मचारी यांनेच गावातील नागरीकांना दिली. यावेळी घटनेची माहिती भडगाव पोलीसांना देण्यात आली. पोलीस घटनास्‍थळी पोहचल्‍यानंतर पाहिले असा बँकेत प्रत्यक्ष चोरांकडुन बँकेचे कुलुप, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा प्रकार दिसून आला नाही. तसेच बँकेत असलेल्या रोकड रक्कमेला हात लावलेला नव्हता. यामुळे यात बँकेतीलच कर्मचार्‍यांचा सहभाग असावा असा संशय प्रथमदर्शनी येत होता.

अन्‌ त्‍यांनी दागिने काढून दिले

बँकेच्या मागे रहाणारा शिपाई राहुल पाटील यास विचारपुस करत माहिती घेतली असता व पोलीसी खाक्या पोलीसांनी दाखविला असता तो पोपटासारखा बोलुला लागला. या चोरी प्रकरणी बँक शिपाई राहुल पाटील व त्याचे अन्य दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. यात आरोपींची वाढ होण्याची शक्यता पोलीसांकडुन वर्तविली जात आहे. दरम्यान, भडगाव पोलीसांनी ताब्यात घेतलेला आरोपी कर्मचारी व अन्य दोन साथीदार यांना बोलत करत जबरी चोरी घटनेतील मुद्देमाल कुठे लपविला आहे. याबाबत खात्री करत तिघा आरोपींपैकी एका आरोपीच्या आमडदे शेत शिवारातील जोगडाकडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपविलेले दागिने आरोपीनी काढुन दिले. या जबरी चोरीचा उलगडा होऊन पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व त्यांच्या पोलीसांनी अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत चोरीचा पर्दाफाश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT