Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: बँकेत जात असल्याचे सांगून घरातून निघाला; वाटेतच मृत्यूने गाठले

Jalgaon News : बँकेत जात असल्याचे सांगून घरातून निघाला; वाटेतच मृत्यूने गाठले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आईला सांगून घरातून निघाला. परंतु जळगावी जात असताना तरुणाला वाटेतच मृत्यूने गाठले. अव्हाणी (ता. धरणगाव) येथील (Jalgaon) तरुणाचा सावखेडा शिवारातील कचरा फॅक्ट्रीजवळ रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला. (Latest Marathi News)

पवन राजेंद्र बाविस्कर (वय २२) असे या युवकाचे नाव आहे. अव्हाणी गावात काम करून शिक्षण घेत असलेला पवन सोमवारी (११ सप्टेंबर) सकाळी जळगावला बँकेत जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. दरम्यान दुपारी (Railway) रेल्वे स्टेशन प्रबंधकांनी तालूका पोलिसांना माहिती दिल्यावर सहाय्यक फौजदार अनील फेगडे, कर्मचारी अनिल मोरे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जिल्‍हा रुग्णालयात अंगझडती घेतल्यावर खिशात मिळालेल्या ओळखपत्रावरुन त्याची ओळख पटल्यावर कुटूंबीयांना माहिती कळविण्यात आली. 

दीड वर्षांपूर्वीच वडिलांचा मृत्यू 

पवनच्या मृत्युची माहिती कळताच कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला. पवनचे वडील राजेंद्र बाविस्कर यांचेही दीड वर्षांपुर्वी अपघाती निधन झाल्याने कुटूंबाची सर्वस्व जबाबदारी त्याच्यावर हेाती. काम करुन त्याने पदवीपर्यंत शिक्षण पुर्ण केले. दरम्यान, पवनच्या मृत्युचे कारण अद्याप समोर आलेले नसुन, तालूका पोलिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT