महाराष्ट्र

लक्ष्‍मीच्‍या मुर्तीवर अखेरचा हात; यंदा साकारल्‍या गेल्‍या कमी मुर्ती

रेखीव लक्ष्‍मीच्‍या मुर्तीवर अखेरचा हात; यंदा साकारल्‍या गेल्‍या कमी मुर्ती

संजय महाजन

जळगाव : दिवाळी दोन दिवसांवर आली आहे. यात महत्‍त्वाचा दिवस म्‍हणजे लक्ष्‍मीपुजनचा. या लक्ष्मीपूजनासाठी साकारण्यात येणाऱ्या लक्ष्मी मूर्तींवर मुर्तिकारांकडून अखेरचा हात फिरविला जात आहे. मात्र वाढत्‍या महागाईमुळे कुंभार समाजावर आर्थिक संकट ओढवल्‍याची प्रतिक्रीया व्‍यक्‍त केली जात असून यंदा मुर्ती कमी साकारल्‍या आहेत. (jalgaon-news-last-hand-on-the-idol-of-Lakshmi-The-fewer-idols-that-have-been-realized-this-year)

दिपोत्‍सवाला वसुबारसपासून सुरवात होत असते. यंदाचा दीपोत्‍सव उद्यापासून (१ नोव्‍हेंबर) सुरू होत आहे. तर साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्‍या लक्ष्‍मीपुजन ४ नोव्‍हेंबरला आहे. दीपोत्‍सवाला काही दिवस बाकी राहिल्‍याने लक्ष्‍मीपुजनासाठी सर्वत्र तयारी सुरू आहे. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी मूर्तींवर अखेरचा हात मूर्तिकार फिरवत आहेत.

कुंभार अडकले आर्थिक विवंचनेत

गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक विवंचनेत असलेले कुंभार बांधवांना या वर्षी महागाईचा सामना करावा लागत असून मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या साहित्यांच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून मागील दोन वर्षांपूर्वीचा भावाने मुर्त्यांची मागणी केली जात आहे. त्यामुळे पारंपारिक कुंभार व्यवसाय करणाऱ्या मूर्तिकार मात्र आर्थिक विवंचनेत सापडले आहे. भुसावळ शहरात पिढ्यानपिढ्या कुंभार व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारे काशिनाथ कुंभार यांनी देखील महागाईमुळे दरवर्षीपेक्षा कमी प्रमाणात मुर्त्यांची निर्मिती केली असून एकीकडे सर्व व्यवसाय उद्योग सुरळीत होत असताना मात्र पारंपारिक कुंभार व्यवसाय करणाऱ्यांवर आजही आर्थिक संकट कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच; मुख्य निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

सेक्सटॉर्शन, डिजिटल अरेस्ट.. मुंबईकरांनी १५ महिन्यात गमावले ११२७ कोटी रूपये

Tax Saving Tips : करदात्यांच्या कामाची बातमी! टॅक्स वाचवण्याचे ५ मार्ग, ITR फाइल करण्याआधी नोट करा

HBD Sonu Nigam : लग्जरी गाड्यांचा शौकीन सोनू निगम कोट्यावधींचा मालक

SCROLL FOR NEXT