Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Thirty First Celebration : जळगाव जिल्ह्यात १ लाख नागरिकांना मद्य प्राशन परवाना; ३१ फर्स्टसाठी एका दिवसाची परवानगी

Jalgaon News : थर्टी फर्स्ट अर्थात नववर्षाचे स्वागत करण्याच्या अनुषंगाने हॉटेल, ढाबे अशा ठिकाणी पार्ट्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. तर काहीजण घरी किंवा शेतात जाऊन पार्टी करत सेलिब्रेशन करत असतात

Rajesh Sonwane

जळगाव : नववर्ष स्वागतासाठी पार्ट्या आयोजित करत त्यात मद्य देखील प्राशन केले जात असते. मद्य प्राशन करणाऱ्यांवर कारवाई केली जात असते. मात्र हि कारवाई टाळण्यासाठी अधिकृत परवाना काढून घेतला जात असतो. अशा प्रकारे जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ३१ फर्स्टच्या पार्श्वभूमीवर एक लाख नागरिकांना एक दिवसीय मद्य प्राशन करण्याचे परवाने वितरीत करण्यात आले आहे. 

थर्टी फर्स्ट अर्थात सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्याच्या अनुषंगाने हॉटेल, ढाबे अशा ठिकाणी पार्ट्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. तर काहीजण घरी किंवा शेतात जाऊन पार्टी करत सेलिब्रेशन करत असतात. दरम्यान पार्टी करण्यासोबत अनेकजण अवैधपणे मद्य प्राशन करत गोंधळ देखील घालत असतात. अशांवर पोलिसांची नजर राहत असते. मात्र थर्टी फर्स्टला दारू पिण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली असून एका दिवसासाठी परवानगी देण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विठ्ठल भुकन यांनी सांगितले. 

जिल्ह्यात ५९५ बिअर बार 

जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण ५९५ परमिट रूम बियर बार आहेत. तर ३४ वाईन शॉप व १४६ बिअर शॉपी आहेत. याठिकाणी पिणाऱ्यांची गर्दी असते. मात्र अवैध मद्य विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची नजर करडी नजर राहणार असल्याचे अधीक्षक भूकन यांनी सांगितले. तसेच अवैध मद्य विक्री व बनावट दारू रोखण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले असून त्या माध्यमातून कारवाई केली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

थर्टी फर्स्टनिमित्ताने पथक तैनात 
शासनाच्या आदेशानुसार मद्य विक्रीची वेळ ठरवून दिली असून त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या ढाब्यांवर मद्य प्राशन न करता परमिट रूम, बियर बार या ठिकाणी मद्यप्राशन करण्याचे आवाहन अधीक्षकांनी केले आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज असून कारवाईसाठी जिल्ह्यात कर्मचारी तसेच पथक नियुक्त करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT