Jalgaon Soldier Death Saam tv
महाराष्ट्र

Soldier Death : रोटवद येथील जवानाला वीरमरण; दिवाळीच्या सुटीनंतर चर्च दिवसापूर्वी गेले होते कर्तव्यावर

Jalgaon News : दिवाळीच्या सुट्टीत घरी आले होते. गेल्या चार दिवसांपूर्वीच परिवारासोबत ते सुरेंद्रनगर (गुजरात) येथे गेले होते

साम टिव्ही ब्युरो

धरणगाव (जळगाव) : रोटवद (ता. धरणगाव) येथील मूळ रहिवासी आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल पाटील (वय ३९) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. जवान विनोद पाटील दिवाळीला घरी आले होते. त्यांनी लक्ष्मीपूजन रोटवदला केले. नंतर भावाकडे अंकलेश्वर येथे भाऊबीज करून ते ड्यूटीवर हजर झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. (Tajya Batmya)

जवान विनोद जवरीलाल पाटील हे रोटवद (ता. धरणगाव) येथील रहिवासी असून, गेल्या अकरा वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत होते. ते सध्या गुजरात राज्यातील अहमदाबाद सैनिक दल कॅम्पमध्ये ते नवीन भरती झालेल्या जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत होते. जवान विनोद पाटील दिवाळीच्या सुट्टीत घरी आले होते. गेल्या चार दिवसांपूर्वीच परिवारासोबत ते सुरेंद्रनगर (गुजरात) येथे गेले होते. त्यानंतर ड्यूटीवर रुजू झाले. दरम्यान, १८ नोव्हेंबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना गांधीनगर येथे दाखल केले. स्थिती नाजूक असल्याने डॉक्टरांनी ताबडतोब अहमदाबाद येथे हलविले. मात्र ऑक्सिजनची कमतरता आणि कोमात गेल्याने त्यांच्या मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार 

दरम्यान, धरणगाव तालुक्यात त्यांच्या कुटुंबातील कोणीही नाही. त्यांचे पार्थिव परिवारासह रोटवद येथे येईल. शासकीय इतमातात अंत्यसंस्कार होणार आहेत. गावातून त्यांची अंत्ययात्रा निघणार. त्यांच्या पश्चात जवरीलाल वेलचंद शिंदे (वडील), जनाबाई शिंदे (आई), माधुरी शिंदे (पत्नी), आदित्य (मुलगा), हर्षल (मुलगा), प्रमोद शिंदे (भाऊ) असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष विनोद पाटील शहीद झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन|VIDEO

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

SCROLL FOR NEXT