Jalgaon Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन ठिकाणी ढगफुटी

सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी; तीन ठिकाणी ढगफुटी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता. ११) रात्रीपासून सूरू झालेल्या विजांच्या कडकडाटांसह धुवाधार पावसाने (Heavy Rain) जिल्ह्यातील सहा महसुली मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसाने कापूस, केळी, मका, लिंबू बागांचेही नुकसान झाले आहे. (Jalgaon News Heavy Rain)

गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने ७६६ हेक्टरवरील केळी, कापूस, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात (Jalgaon) जळगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा (Pachora) तालुक्यांत नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात पाठविला आहे. यात २२ गावे बाधित असून, एक हजार ३३६ शेतकऱ्यांचे (farmer) नुकसान झाले आहे.

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसामुळे सखल भागात पाणी साचले. अनेक शेतात पाणी साचल्याने कापूस, केळी पिकांचे, सोयाबीनचे नुकसान झाले. दुसरीकडे पिकांना जीवदान मिळून पिकांना फुलोर लागण्याची स्थिती आगामी काळात होणार आहे. रविवारी एकूण सरासरी २५ मिलिमीटर पाऊस झाला. रावेरला ६० मिलिमीटर, जळगावला ५१.८ मिलिमीटर, भुसावळला ३६ मिलिमीटर, चोपडा ४९, मुक्ताईनगर तालुक्यात ४०.३ पाऊस झाला.

तीन ठिकाणी ढगफुटी

भोकर, धानोरा, अडावद या महसूल मंडळांत ९० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होऊन ढगफुटी झाली. तर अंतुर्ली, ऐनपूर, खिर्डी, पिंप्राळा, रावेर, सावदा महसूल मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्मार्ट मीटरच्या अफवांवर महावितरणचे स्पष्टीकरण; नेमकं काय सांगितलं?

VIRAL VIDEO: वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला अन्...हायवेवरचा थरार, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Makeup Tips: घाम किंवा पावसामुळे मेकअप होणार नाही खराब! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शेताला पाणी देऊन आलो म्हणाले अन् दुकानात आढळला मृतदेह, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेजुरी येथे घेतली जखमींची भेट

SCROLL FOR NEXT