मुसळधार पाऊस 
महाराष्ट्र

मुसळधार पाऊस..चाळीसगाव शहरातील दोन्ही बाजूचा संपर्क तुटला

मुसळधार पाऊस..चाळीसगाव शहरातील दोन्ही बाजूचा संपर्क तुटला

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : शहरासह तालुक्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी- नाले फुलवून ओसंडून वाहत आहेत. शहरातून वाहणाऱ्या तितुर व डोंगरी नदीला पूर आला असून पुराचे पाणी शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या पुलांवरून वाहत असल्याने दोन्ही बाजूचा संपर्क तुटला आहे. (jalgaon-news-Heavy-rain-there-was-no-communication-between-the-two-sides-of-Chalisgaon-city)

शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील पाटणादेवी, शिवापुर, मोठा महादेव, कन्हेरगड, परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पाटणा गाव आणि परिसरात पाऊस सुरूच असल्याने नदीपात्रात अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीलगतच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

बारा प्रकल्‍प ओव्‍हरफ्लो

गिरणा धरण परिसरातही चांगला पाऊस होत असल्याने धरणाचा जलसाठा ७८ टक्के झाला आहे. तालुक्यातील मन्याड धरण परिसरात ७५ मिमी पावसाची नोंद झाली असून सध्या या धरणातून पाच हजार क्युसेसचा विसर्ग सुरु आहे. तर जामदा (ता. चाळीसगाव) बंधा-यातून १५ हजार क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील १४ पैकी १२ मध्यम जलप्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. बोरखेडा व देवळी- भोरस मध्यम प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत.

नदीला मोठ्या पुराची शक्‍यता

चाळीसगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षात प्रथमच विक्रमी पर्जन्यमान होत आहे. जूनपाणी व शिंदी (ता. चाळीसगाव) येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदीला मोठा पूर येण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT