Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil : आमच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या सभांचा फरक पडणार नाही; मंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon News : जळगाव ग्रामीण मतदार संघात जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराला वेग आला असून या प्रचारादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली

संजय महाजन

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदार संघ हा आमचा बालेकिल्ला असून तो अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पक्षाचा नेता हा आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करत असतो. (Sharad Pawar) शरद पवार यांच्या सभांचा फारसा फरक पडणार नाही. आम्ही आतापर्यंत फर्स्टक्लासनेच पास झालो आहोत; असे मत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी व्यक्त केले.  

जळगाव (Jalgaon) ग्रामीण मतदार संघात जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार  स्मिता वाघ यांच्या प्रचाराला वेग आला असून  या प्रचारादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. काही (Shiv Sena) शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत नाही. काही भाजपचे कार्यकर्ते काम करत नाही. मात्र मी असं म्हटलं आहे कोणी काम करो न करो मात्र शिवसैनिक हा काम करत राहील

ठाकरेंचे बोलणे उचित नाही 
करण पवार ईव्हीएम मशीनबद्दल आता बोलत आहे. मात्र ईव्हीएम मशीन हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं असून हा त्यांचा रडीचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करताना म्हटले होते की नरेंद्र मोदी हे दुर्दैवी पंतप्रधान. यावर गुलाबराव पाटील म्हटले आहे हे त्यांचं मत असून लोकांनी मान्य केलेल्या व्यक्तीच्या बाबतीत असे बोलणे उचित नाही. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी नरेश मस्के यांच्यावर टीका करताना एक गद्दार हा राजन विचारे यांच्यासमोर उभा आहे. पण जितेंद्र आव्हाड यांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही नरेश मस्के हे शिवसैनिक आहे; असे मात्र  मंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Property: मलाइकाने अलिशान फ्लॅट दिला रेंटवर, इकडे सारा अन् माधुरीनं घर घेतलं भाड्याने, कितीची झाली उलाढाल?

Sonam Kapoor Baby Photo : बाळाला हातात घेताच सोनम कपूर भावुक, अनिल कपूरच्या नातवाची पाहा पहिली झलक

राज्य सरकारचा दिलासा! रेडी रेकनरच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा काय होणार फायदा?

Rule Change From Today: ATM लिमिट ते ट्रेडिंग; आजपासून ४ महत्त्वाचे नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार?

Plane Crash: टेकऑफनंतर रडारमधून झालं गायब; रशियन लष्कराचं विमान कोसळलं, २९ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT