Gold Silver Price
Gold Silver Price Saam tv
महाराष्ट्र

Gold Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदीचे दरही ५,५००ने वाढले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतारामुळे गेल्या दिवसांपासून सोने- चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. यात मागील महिनाभरातच सोने, चांदीच्या दरात (Gold Price Today) वाढ झाली असून सोने दरात प्रतितोळा तीन हजार, तर चांदीच्या (Silver) दरात प्रतिकिलो साडेपाच हजारांची वाढ झाली आहे. (Maharashtra News)

लग्नसराई सुरू झाल्यानंतर सोने चांदीच्या भावात (Gold Rate) सातत्याने वाढ होत आहे. त्यात गेल्या पाच दिवसात तर अधिकच वाढ होत आहे. जागतिक पातळीवर मागणी वाढण्यासह भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरचे दर वधारत असल्याने सोने - चांदीच्या भावात वाढ होत आहे.

दिवाळीत दर होते स्‍थीर

गेल्या महिन्यात सुरू झालेल्या (Marriage) लग्नसराईमुळे सोन्याला प्रचंड मागणी होत आहे. सुवर्ण व्यावसायिकांच्या अनुभवानुसार सोने, चांदीच्या दरात हवीतशी भाववाढ होत नव्हती. आता चांगला दर सोने, चांदीला मिळाला आहे. दिवाळीच्‍या दरम्‍यान सोन्याचा दर प्रतितोळा ५१ हजार, तर चांदीचा प्रतिकिलो ५९ हजार होता. तोच दर पाडवा, भाऊबीजेनंतर २८ ऑक्टोबरपर्यंत कायम होता.

दिवाळीच्‍या दरम्‍यान अर्थात २९ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात दोनशे, तर चांदीच्या दरात पाचशेची घट झाली होती. ४ नोव्हेंबरला सोने प्रतितोळा ५० हजार ८००, तर चांदी ५९ हजार ५०० (जीएसटीविना) होते. १८ नोव्हेंबरला सोन्याचे दर प्रतितोळा ५२ हजार ५००, तर चांदी ६२ हजारांपर्यंत (जीएसटी) पोचले होते. तसेच २५ नोव्हेंबरला चांदीत तब्बल दीड हजारांची वाढ होऊन चांदी ६३ हजार ५०० पर्यंत पोचली होती. १ डिसेंबरपासूनही सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज सोने ५३ हजारांवर, तर चांदी ६४ हजारांवर पोचली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT