Gold Price Today Saam tv
महाराष्ट्र

Gold Price Today: सोने पाचशे तर चांदीत तीन हजारांची वाढ

सोने पाचशे तर चांदीत तीन हजारांची वाढ

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर सोने बाजाराने उसळी घेतली आहे. मागील दोन दिवसांच्‍या तुलनेत सोन्यात दरात पाचशेनी उसळी घेतली. चांदीच्या (Silver) दरातही तीन हजारांची वाढ झाली आहे. विजयादशमीला (Gold Price Today) सोन्याला प्रचंड मागणी असते. ती मागणी लक्षात घेता सोने, चांदीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

साडेतीन मुहूर्तापेक्षा एक असलेला (Dussehra) विजयादशमीचा मुहूर्त आहे. त्यावर सोन्याच्या दागिन्यांची मोठी खरेदी होते. लवकरच दिवाळी, पाडवा, भाऊबीज यासारखे सण आहेत. यामुळे आता (Gold) सोने, चांदीचा दर वाढताच राहील, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी वर्तविला आहे. एक ऑक्टोबरला सोन्याचा दर ५१ हजार (प्रती तोळा) होता. चांदी ५९ हजार प्रतिकिलोचा दर होता. आज सोन्याचा दर ५१ हजार ५०० तर चांदीचा दर ६२ हजार आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली तरी या मुहूर्तावर ग्राहकांची सोने खरेदीस गर्दी होणार असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

सोने, चांदीचे दर असे (जीएसटी विना)

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

१६ ऑगस्ट--५२ हजार ५००--६० हजार

२२ ऑगस्ट--५२ हजार--५६ हजार ५००

३० सप्टेंबर--५१ हजार--५७ हजार ५००

१ ऑक्टोबर--५१ हजार---५९ हजार

४ ऑक्टोबर--५१ हजार ५००--६२ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT