Gold Silver Price Saam tv
महाराष्ट्र

Gold Silver Price: आठ दिवसांपासून सोने, चांदीला झळाळी कायम

आठ दिवसांपासून सोने, चांदीला झळाळी कायम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गेल्या आठ दिवसांपासून सोने, चांदीला झळाळी कायम असली तरी सोने, (Silver) चांदीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे चित्र सोने (Gold) बाजारात आहे. पंधरवड्यात सोन्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात एक हजारांची घसरण झाली आहे. (Live Marathi News)

सोन्यातील गुंतवणूक ही लागलीच रोकड देणारी मानली जाते. सोने, चांदी मोड दिली, की मिळालेल्या पैशांतून नागरिक आपली आर्थिक गरज पूर्ण करतात. त्यामुळे सोन्यात दर वर्षी गुंतवणूक वाढत आहे.

नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वी सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचा दर जीएसटीसह ५८ हजार ८०० वर पोचला होता, तर चांदीचा दर जीएसटीसह ७२ हजार १०० वर पोचला होता.

गत वर्षी १२ एप्रिल २०२२ चांदीचा दर ७० हजार प्रतिकिलोवर गेला. नंतर ६९ हजारांवर आला. जुलैमध्ये सोने ६१ हजारांपर्यंत पोचला. १ सप्टेंबरला चांदी ५४ हजारांपर्यंत खाली आली. नंतर सोने, चांदीच्या दरात वाढ होत गेली ती दिवाळीपर्यंत. दिवाळीला सोने ४९ हजार ९०० प्रतितोळे, तर चांदी ५६ हजार ५०० प्रतिकिलो होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: मोदी सरकार बेरोजगारांना २,५०० रुपये देणार? काय आहे केंद्राच्या योजनेचं सत्य?

वयाची तिशी गाठलेल्यांनाही होतोय डायबिटीज; 'ही' 5 लक्षणं दिसताच करा चेकअप

Made in Pakistan Cosmetics: पाकच्या सौंदर्यप्रसाधनांचा राज्यात सुळसुळाट; ‘गोरी ब्युटी क्रीम’चं संगमनेर कनेक्शन

Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

'सर्वच क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच, आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, मुंडे भाऊ-बहिणीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT