Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: सोशल मीडियावरील मैत्री, तरुणी तिथेच फसली; लग्नाचं वचन देऊन तरुणाने केलं भलतंच कांड

सोशल मिडीयावर फ्रेंडशीप; लग्नाचे आमीष देत घरात येवून तरुणीवर अत्‍याचार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ वर्षीय तरुणीशी फेसबुकवर फ्रेंडशीप केली. यानंतर (Jalgaon) तिच्यावर घरात घुसून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Live marathi News)

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबियांसह वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीची ओळख इद्रिस खाटीक नावाच्या तरुणाशी फेसबुकवर झाली होती. डिसेंबर २०२२ मध्ये दोघांची भेटही झाली. इद्रिसने तिच्या घराचा शोध घेत ती घरात एकटी असताना शिरकाव केला. लग्नाचे आमीष देत या तरुणीशी सलगी करुन तिच्या ईच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापीत केले. दुसऱ्यांदाही तरुणी घरात एकटी असताना भामट्याने घरात येवुन मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले.

फोटो व्‍हायरल करायची धमकी

पिडीतेने लग्नाच्या बोलणीसाठी तगादा लावल्यावर संशयीताने टाळाटाळ करण्यास सुरवात केली. त्यामुळे पिडीतेने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने संशयिताने तिचे फोटो (Social Media) सोशल मिडीयावर अपलोड करण्याची भिती दाखवुन वारंवार अत्याचार केले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर तरूणीने पालकांना घडला प्रकार सांगितला. पिडीतेच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक रुपाली महाजन यांनी जबाब नोंदवुन घेत संशयीत इंद्रीस खाटीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अनंत कळसेंना लोकउपायुक्त पदाची ऑफर?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याची ऑनलाइन फसवणूक; ५० हजाराचं घड्याळ निघालं नकली, VIDEO शेअर करत सांगितला धक्कादायक प्रकार

Kolhapur : बंदोबस्तावेळी कार अडवली, दरवाजा उघडताच धक्कादायक प्रकार आला समोर

वाद मिटवण्याच्या बहाण्यानं घरात घुसला, दोन पोरांसमोरच घेतला होमगार्ड बायकोचा जीव

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा हप्ता 'या' तारखेला खात्यात होणार जमा

SCROLL FOR NEXT