Marriage 
महाराष्ट्र

एक नव्‍हे दोन लग्‍नाची गोष्‍ट; प्रियकर पतीने फोटो दाखविले अन्‌ फुटले बिंग

एका नव्‍हे दोन लग्‍नाची गोष्‍ट; प्रियकर पतीने फोटो दाखविले अन्‌ फुटले बिंग

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : प्रियकरासोबत प्रेमविवाह केला. परंतु, घरच्‍या मंडळींनी हा प्रकार लपवून ठेवत मुलीचा विवाह दुसऱ्यासोबत लावून दिला. मात्र विवाहाला दोन महिने झाले असताना जिच्‍याशी विवाह केला ती माझी पत्‍नी असल्‍याचा पुरावा म्‍हणून प्रियकराने तरूणाला फोटो दाखविले अन्‌ सारे बिंग फुटले. (jalgaon-news-fraud-marriage-two-marriage-story-Beloved-husband-shows-photos-and-bursts-into-tears)

जळगाव शहरातील पिंपाळा परिसरातील तरूणाला व्‍हॉटस्‌ॲप ग्रुपच्‍या माध्‍यमातून औरंगाबाद येथील तरूणीचे स्‍थळ आले. मुलगी पसंत पडल्‍याने ३ मेस त्‍यांचा विवाह औरंगाबाद येथे पार पडला. लग्‍न झाल्‍यानंतर पत्‍नीला काही दिवस जळगावी राहू दिल्‍यानंतर नोकरीच्‍या ठिकाणी घेवून गेला. मात्र तेथे दोघेच असताना देखील त्‍यांच्‍या जमत नव्‍हते. पत्‍नीची वागणूक पत्‍नीला खटकत होती. जळगावी असताना काही झाले का? म्‍हणून आई– वडीलांना विचारले असता सदर मुलीची वागणूक येथे देखील चांगली नसल्‍याचे सांगितले.

तुझी पत्‍नी ही माझी पत्‍नी असल्‍याचा आला संदेश

तरूणीने ज्‍या तरूणावर प्रेम होते; त्‍याच्‍यासोबत विवाह केला. परंतु, तिच्‍या घरच्‍यांना हे मान्‍य नसावे म्‍हणून पहिल्‍या विवाहाचे न सांगता तिचा विवाह दुसऱ्यासोबत लावून दिला. मात्र प्रियकर पतीने त्‍या तरूणाचा नंबर मिळवत त्‍याला मॅसेज केला. ज्‍यात तू ज्‍या मुलीशी लग्‍न केले आहे, तिच्‍यासोबत मी प्रेमविवाह केला आहे. यानंतर त्‍याने पुरावा म्‍हणून फोटो देखील व्‍हॉटस्‌ॲपवर पाठविले.

त्‍या तरूणीच्‍या दोन्‍ही पतींची भेट

तरूणीच्‍या दोन्‍ही पतींमध्‍ये संवाद झाल्‍यानंतर त्‍या तरूणाने पत्‍नीच्‍या प्रियकर पतीला पुण्याला भेटण्यासाठी बोलावले. दोघांची भेट झाल्‍यानंतर प्रियकराने त्‍या तरूणाला संपुर्ण प्रकरण सांगून फोटो देखील दाखविले. यानंतर तरूणी व तिच्‍या आई– वडीलांनी केलेल्‍या प्रकाराचे बिंग फुटले.

पोलिसात तक्रार

सदर प्रकरण उघडकीस आल्‍यानंतर तरूणाने आई– वडीलांना सदर प्रकार सांगितला. यानंतर जळगावी येवून रामानंद पोलिसात जावून फसवणूक झाल्‍याची तक्रार दिली. तसेच लग्‍नानंतर तरूणीने प्रियकरासोबत संबंध ठेवल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना

SCROLL FOR NEXT