Farmer Suicide saam tv
महाराष्ट्र

गावात सर्वांच्‍या भेटी घेतल्‍यानंतर केली आत्‍महत्‍या; कर्जाच्‍या बोजातून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

गावात सर्वांच्‍या भेटी घेतल्‍यानंतर केली आत्‍महत्‍या; कर्जाच्‍या बोजातून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

कळमसरे (जळगाव) : सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कळमसरे येथील विष्णु रामदास चौधरी (वय६५) या शेतकऱ्याने आत्‍महत्‍या केली. सदर घटना मंगळवारी (८ फेब्रुवारी) घडली. (jalgaon news farmer Suicide due to infertility and debt)

गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. त्यातून बियाणे, किटकनाशके, खते यांची देणी फेडत नाकीनऊ आले. शिवाय (Crop Debt) पीककर्ज व हात उसनवारीतुन झालेल्या तीन– चार लाखांचा कर्जाचा डोंगर कसा उतरणार, या विवंचनेत विष्णु चौधरी हे बऱ्याच दिवसांपासून नैराश्यमय होते. शेतात यावर्षी खर्च करूनही खर्च वजा जाता उप्पन्न न आल्याने ते कर्जबाजारी झाल्याने त्यांनी टोकाची भूमिका (Farmer Suicide) घेतली असे कुटुंबियांनी सांगितले. त्यांच्यावर पिककर्ज व हात उसनवारीचे सुमारे साडे तीन लाख रूपयांचे कर्ज असल्याचे निकटवर्तीकडून सांगण्यात आले.

सकाळी सर्वांच्‍या घेतल्‍या भेटी

पत्नी आणि मुलगा काही कामानिमित्त बाहेरगावी गेले हेाते. आज सकाळी (Farmer) त्यांनी नित्य नियमानुसार मंदीरावर जावून सर्वांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपल्या स्वमालकीच्या पिठाची गिरिणीच्या स्टोअर रूमला साडीचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी जेवणाला आले नाही; यासाठी तपास केला असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आले. त्यांना तात्काळ अमळनेर (Amalner) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरानी मृत घोषित केले. मृत विष्णु चौधरी यांचे पुतणे देवीदास चौधरी यांच्या खबरीवरुन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubhangi Atre: 'अंगूरी भाभी'चा नवा ग्लॅमरस लूर व्हायरल, ४४ व्या वर्षाच्या शुंभागीचा फिटनेस पाहिलात का?

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Fire : १५ रुग्णालयांच्या इमारतीत भीषण आग, ५० अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी, खिडकी तोडून...

Maharashtra Politics: मोठी बातमी! CM फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा

Black coffee: दररोजची ब्लॅक कॉफी तुमच्या लिव्हरसाठी ठरते फायदेशीर…पण एका अटीवर! तज्ज्ञांनी केले मोठे खुलासे

SCROLL FOR NEXT