death 
महाराष्ट्र

कुटुंबप्रमुखाचा मृत्यू; पत्नी, दोघे मुले अत्यवस्थ, गरिबीमुळे घेतले विष

कुटुंबप्रमुखाचा मृत्यू; पत्नी, दोघे मुले अत्यवस्थ, गरिबीमुळे घेतले विष

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : हाताला रोजगार नसल्याने गरिबीला कंटाळलेल्या येथील रिक्षाचालकाने पत्नी व दोघा मुलांसह विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) प्रेरणानगरात उघडकीस आली होती. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, कुटुंबप्रमुख विलास भोळे (वय ६०) यांचा मंगळवारी (ता. १४) मृत्यू झाला. (jalgaon-news-family-poison-Death-of-head-of-family-Wife-and-two-children-in-critical-condition)

भुसावळ शहरातील प्रेरणानगरातील विलास प्रदीप भोळे (वय ६०) हे पत्नी, मुलगा व घटस्फोटीत मुलीसह वास्तव्यास होते. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय चालेनासा झाल्याने भोळे घरीच थांबून होते. त्यातच पत्नीला रक्तदाब, मधुमेह आदी आजारांनी ग्रासल्याने उपचाराचा खर्च वाढला होता. शिवाय, बेरोजगार असलेला मुलगा व मुलीचा दोन वेळा विवाह झाल्यानंतरही घटस्फोट झाल्याने कुटुंबात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. उत्पन्नाचे साधन नसल्याने प्रपंच चालवणे अवघड झाल्याने या कुटुंबाने सामूहिकरीत्या गुरुवारी सायंकाळी विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच धाव घेत कुटुंबीयांना उपचारार्थ दाखल केले होते.

पत्नी, मुले अत्यवस्थ

रिक्षाचालक विलास भोळे, त्यांच्या पत्नी लताबाई भोळे (५२), मुलगी प्रेरणा भोळे (२८), मुलगा चेतन भोळे (वय २७, सर्व रा. वांजोळा रोड, प्रेरणानगर) यांच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मंगळवारी (ता. १४) पहाटे सहाच्या सुमारास विलास भोळे यांची प्राणज्योत मालवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT