Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : बनावट सही- शिक्क्यांद्वारे तयार केले नियुक्तीपत्र; भुसावळ येथील तरुणावर गुन्हा दाखल

Jalgaon News : निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तर उमेदवारांना मेल आयडीवर माहिती देण्यात आली

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेंतर्गत भरण्यात येत असलेल्या आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती मिळविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व स्कॅन केलेल्या स्वाक्षरीद्वारे बनावट नियुक्ती पत्र तयार करण्यात आल्याचे प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नियुक्ती पत्र तयार करणाऱ्या भुसावळ येथील तरुणाविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तर उमेदवारांना देखील त्यांच्या मेल आयडीवर माहिती देण्यात आली. याच आदेशाचा संदर्भ वापरून भुसावळ येथील अमोल कैलास सुशीर याने आरोग्यसेवक पदावर नियुक्तीचा आदेश बनवून घेतला. 

स्कॅन केलेल्या सहीचा वापर 

बनावट नियुक्ती आदेश बनवून सार्वजनिक आरोग्य विभागाचा तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा शिक्का व स्कॅन केलेली सही वापरल्याचे आढळून आले आहे. दरम्यान बनावट आदेश मुक्ताईनगर पंचायत समितीच्या कार्यालयीन अधीक्षकांकडून जिल्हा परिषदेच्या सहायक प्रशासन अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बनावट आदेशात व मूळ आदेशात तफावत आढळून आलेली आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल
आरोग्य सेवक पद नियुक्तीसाठी संबंधिताने बनावट सही, शिक्के वापरून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून अमोल सुशीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आर्थिक स्थिती चांगली राहील, पार्टनरसोबत मतभेद होतील; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाची चक्र फिरणार

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

SCROLL FOR NEXT