Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: कंपनीत गेला तो परलाच नाही; कामगार दिनीच संपविले जीवन

कंपनीत गेला तो परलाच नाही; कामगार दिनीच संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील मेहरूण परिसरातील ३६ वर्षीय कामगाराने विषारी द्रव प्राशन करुन एमआयडीसीतील (Jalgaon) कंपनीतच साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवार (ता. १) रोजी रात्री एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मयताच्या कुटूंबीयाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. (Tajya Batmya)

शिरपुर येथील मुळ रहिवासी संजय बंडू शेवाळे (वय ३६) गेल्या दहा- बारा वर्षांपासुन कामधंद्यासाठी जळगाव शहरातील मेहरूण परिसरात आई, पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला होता. संजय हा एमआयडीसी परिसरातील साईराम ट्रेंडींग कंपनीतील कोल्ड स्टोरेज या ठिकाणी कामाला होता. नेहमीप्रमाणे रविवार (ता.३०) सकाळी ८ वाजता जेवणाचा डबा घेवून संजय शेवाळे हा कंपनीत कामावर गेला.

कामगार दिन असल्यामुळे कंपनी बंद होती. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीतील सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी लोखंडी अँगलला संजय शेवाळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने एमआयडीसी पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजयच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी आश्विनी, विवाहित बहिण, दुर्गेश (वय ४) आणि सलोनी (वय-६) ही दोन मुले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

मयत संजयचा मृतदेह पोलिसांनी कंपनीतून जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. संजयने गळफास घेतलेली जागा आणि त्याचे कपडे पाहिल्यावर त्याने आगोदर विषारी द्रव घेतल्याचे आढळून आले. विष घेतल्यानंतर कसा गळफास घेईल? अशी शंका कुटूंबीय आणि परिचितांनी व्यक्त केली. यामुळे आत्महत्या नसून संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT