Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पत्‍नीसोबत जेवण केल्‍यानंतर संपविले जीवन; तीनच महिन्यापुर्वी झाले होते लग्‍न

Jalgaon Crime News : पत्‍नीसोबत जेवण केल्‍यानंतर संपविले जीवन; तीनच महिन्यापुर्वी झाले लग्‍न

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : शहरातील बिबानगरमधील रहिवासी आणि अवघ्या तीनच महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या (Jalgaon News) तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेश अनिल राठोड (वय २५), असे मृताचे नाव आहे. (Breaking Marathi News)

जळगाव शहरातील बिबानगर परिसरातील रहिवासी जितेश राठोड रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याचे आई–वडिल व मोठा भाऊ (Marriage) द्वारकानगरात वास्तव्याला आहेत. बुधवारी (१९ जुलै) घरी परतल्यावर पत्नीसोबत रात्रीचे जेवण करून झोपायला गेला. रात्री साडेबाराच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेतला.

पतीला पाहून पत्‍नी हादरली

रात्रीच जितेशच्या पत्नीला हा प्रकार लक्षात आला. तिने भेदरून शेजाऱ्यांना सांगितले. सासू आणि सासऱ्यांना बोलावून घेतले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. जितेशचे २२ मेस लग्न झाले होते. तालुका पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह नातेवाइकांचा ताब्यात दिला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकी सैन्यातील अधिकाऱ्याने रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट, कोणी वाचवला जीव? धक्कादायक अहवाल समोर

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्रातला तो खासदार कोण? अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Satish Shah Love Story: दोन वेळा नकार नंतर थेट लग्न; चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही अभिनेते सतीश शाह यांची लव्हस्टोरी

Avneet Kaur Photos: अवनीत कौरच्या हॉट अदा, फोटोंवरून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT