Gulabrao Patil Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil: खडसेंनी राष्ट्रवादी संपवली; गुलाबराव पाटील यांचा आरोप

खडसेंनी राष्ट्रवादी संपवली; गुलाबराव पाटील यांचा आरोप

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करून टाकण्याचे आश्वासन शरद पवारांना देत भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या (Eknath Khadse) एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीचे निम्मे कार्यकर्ते नाहीत. अर्थात एकनाथ खडसे यांना असलेल्या विरोधामुळे (NCP) राष्ट्रवादी देखील संपण्यात जमा असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला. (Maharashtra News)

जळगाव (Jalgaon) जिल्‍हा दूध संघ निवडणूकीत खडसेंचा पराभव करत (BJP) भाजप, शिंदे गटाने बाजी मारली आहे. या निकालानंतर प्रतिक्रीया देताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलत होते. गुलाबराव पाटलांनी केलेल्या आरोपाला खडसेंनी देखील प्रतिउत्तर दिले आहे.

खडसेंचा पलटवार

सहकार विभागातील ही निवडणूक असल्याने राष्ट्रवादीने पहिल्यांदाच आपल्या बळावर ही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची या ठिकाणी ताकद पाहायला मिळाली आहे. राहिला विषय राष्ट्रवादीचा तर ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के ग्रामपंचायत राष्ट्रवादीने विजय केले असून शिवसेनेला तिथं कुठेही यश मिळाले नसल्याचा पलटवार एकनाथ खडसे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT