Bajar Samiti Election Saam tv
महाराष्ट्र

Bajar Samiti Election: धरणगाव बाजार समिती शिंदे– भाजप गटाचे वर्चस्‍व

धरणगाव बाजार समिती शिंदे– भाजप गटाचे वर्चस्‍व

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

धरणगाव (जळगाव) : धरणगाव बाजार समितीवर अटीतटीच्या लढतीत एक हाती सत्ता मिळवण्यात शिंदे भाजप (BJP) गटाला यश मिळालं आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी १८ पैकी १२ जागांवर मोठा विजय मिळवत वर्चस्व सिध्द केले आहे. (Live Marathi News)

धरणगाव (Dharangaon) बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) माजी मंत्री गुलाबराव देवकर ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ तसेच ठाकरे गटाची युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट या पद्धतीने (Bajar Samiti) बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावली होती.

धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर राष्ट्रवादीच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ सहा जागांवर विजय मिळवता आला आहे. एक हाती विजय मिळवल्यानंतर भाजप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. ढोल ताशाच्या गजरावर तसेच गुलाबाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळाले.

धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाजप शिंदे गटाच्या सहकार सहकार पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केला आहे. भाजप शिंदे गटाला या ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार यांच्या गटाचाही पाठिंबा मिळाला होता. याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर धरणगाव बाजार समितीवर भाजप शिंदे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT