Ajit Pawar saam
महाराष्ट्र

उपमुख्‍यमंत्री अजित पवारांचे ठरले; जळगावात उद्या दौरा

उपमुख्‍यमंत्री अजित पवारांचे ठरले; जळगावात उद्या दौरा

संजय महाजन

जळगाव : राज्‍यात महाविकास आघाडीचे (MahaVikas Aaghadi) सरकार स्थापन झाल्यानंतर शिवाय उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) हे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्‍ह्यात विविध कामांचा शुभारंभनिमित्‍त तसेच कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील. (jalgaon-news-Deputy-CM-Ajit-Pawar-Tour-in-Jalgaon-tomorrow)

राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (ता.१७) जिल्‍हा दौऱ्यावर येत आहे. मुख्‍य म्‍हणजे राज्‍यात सरकार स्‍थापनेनंतर ते प्रथमच जळगावात येत आहे. शिवाय एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाल्यानंतर प्रथमच जळगावात येत असल्‍याने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून आहे. उपमुख्‍यमंत्री पवार ह जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री असल्‍याने आता ते आगामी निवडणूकांच्‍या दृष्‍टीने काय मंत्र देतात यावर लक्ष आहे.

असा असेल दौरा

शुक्रवारी सकाळी आठला अजित पवार ह विमानाने जळगाव विमान तळावर येतील. तेथून अजिंठा विश्रामगृहावर ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. यानंतर सकाळी दहाला जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी बैठक, त्यानतंर जिल्हा दूध विकास संघाच्या नवीन दूध प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करतील. त्यानतंर ते भुसावळ येथे रवाना होवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबात हजारो नागरिक आणि शेतकऱ्यांची गर्दी..

ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

SCROLL FOR NEXT