Soldier Death Saam tv
महाराष्ट्र

भातखंड्यातील जवानाला कर्तव्यावर वीरमरण

भातखंड्यातील जवानाला कर्तव्यावर वीरमरण

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : भातखंडे (ता. भडगाव) येथील भूमिपुत्र असलेले सैन्यदलातील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील (वय ४०) यांचे युनिट बिकानेर येथून आगरतळा या ठिकाणी जात असताना गोरखपूरजवळ रेल्वे (Railway) प्रवासात त्यांची अचानक तब्येत खराब झाली. तेथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांचा मृत्यू (Death) झाला. त्यांच्या मृत्यूने भातखंडे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मंगळवारी (ता. ५) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. (jalgaon news Death on duty to a soldier from Bhatkhand)

जवान दत्तात्रय पाटील हे मार्च २००३ मध्ये नाशिक (Nashik) येथे सैन्यात भरती झाले होते. ते ३०५ फिल्ड रेजिमेंटमध्ये सेवेत होते. त्यांचे प्रशिक्षण हैदराबाद व बंगळूर या ठिकाणी झाले आहे. त्यांनी सिक्कीम, जम्मू, बिकानेर, लेह, लडाख या ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांची बिकानेर येथून आगरतळा या ठिकाणी पोस्टिंग झाली होती. दरम्यान, प्रवासात अचानक तब्येत खालावून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अलाहाबाद येथील लष्करी इस्पितळात (Hospital) आणण्यात आले.

आज दुपारी अंत्‍यसंस्‍कार

त्यांचे पार्थिव वाराणसी येथून मुंबईपर्यंत (Mumbai) विमानाने येणार असून, मुंबईहून भातखंडे येथे मंगळवारी (ता. ५) दुपारपर्यंत भातखंडे येण्यात येणार आहे. दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याचे तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ४) तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT