Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: अपत्य नसल्याने घेतले दत्तक; रेल्वे प्रवासात एक महिन्याच्या चिमुकलीसोबत घडले विपरीत, माता- पित्याचा आक्रोश

Jalgaon News : अपत्य नसल्याने घेतले दत्तक; रेल्वे प्रवासात एक महिन्याच्या चिमुकलीसोबत घडले विपरीत, माता- पित्याचा आक्रोश

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सुरतहून मुळगावी झारखंड येथे जाण्यासाठी रेल्वे प्रवासात असलेले दाम्पत्य रेल्वेने प्रवास करत होते. दरम्यान प्रवासातच दत्तक घेतलेल्या १ महिन्याच्या बालिकेचा (Railway) अचानक मृत्यू झाल्याची घटना सोमवार (२३ ऑक्टोम्बर) मध्यरात्रीनंतर अडीच वाजेच्या सुमारास घडली. (Bhusawal) भुसावळ रेल्वे पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

राबीया हुमायू अन्सारी (रा. झारखंड ह.मु.सुरत गुजरात) असे मृत बालिकेचे नाव आहे. रेल्वे पेालिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंड येथील रहिवाशी हुमायू अन्सारी (वय ३०) पत्नी गुडीया यांच्यासह सुरत (गुजरात) येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत. रेडीमेड कापड कारखान्यात ते नोकरीला आहे. लग्न झाल्यापासून १० वर्षापर्यंत अन्सारी दांपत्याला अपत्य नव्हते. म्हणून हुमायू यांनी शालक यांची एक महिन्याची मुलगी दत्तक (Jalgaon) घेतली होती. रविवार (२२ ऑक्टोम्बर) रोजी ते झारखंडला जाण्यासाठी सुरत येथून रेल्वेने निघाले. प्रवासात मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास सोमवार (ता. २३) धरणगाव येथून रेल्वे जात असतांना चिमुरडी राबीयाची प्रकृती अचानक खराब झाल्याने औषधोपचारासाठी अन्सारी दाम्पत्य भुसावळ रेल्वेस्थानकावर गाडी आल्यावर प्रवास थांबवुन येथे उतरले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भुसावळ रेल्वे पोलीसांच्या मदतीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राबियाला दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. यावेळी बालिकेचे निधन झाल्याने दाम्पत्याने एकच आक्रोश केला होता. सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत भुसावळ रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास रेल्वे पोलीस कर्मचारी आनंद सरोदे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT