Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू; चौघे मित्र गेले होते पोहायला

Jalgaon News : चौघेही पाण्यात उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यापर्यंत पोहचले. काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मेहरुण तलावामध्ये पोहण्यासाठी चार मित्र गेले होते. खोल पाण्यात गेल्याने (Jalgaon) चारही मुले गटांगळ्या खाऊ लागले. हे पाहिल्यानंतर तेथील तरुणांनी उडी घेत तिघांना वाचविले. मात्र यातील एका मुलाचा तलावात बुडून मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. (Tajya Batmya

जळगाव शहरातील शाहूनगर परिसरातील ईशान शेख वसीम (वय १३) असे बुडून मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान शाहूनगर परिसरात राहणारे ईशान शेख, मोईन खान अमीन खान (वय १३), अयान तस्लिम भिस्ती (वय १३) व अस्लम शेख सलाउद्दीन (वय १३) हे चौघे मेहरुण तलाव परिसरात अंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यापर्यंत पोहचले.  काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिघे वाचले पण.. 

सदरचा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. यातील काहींनी तलावात उडी घेत मोईन खान, अयान भिस्ती व अस्लम शेख हे तिघे हाती लागल्याने त्यांना बाहेर काढत वाचविले. त्यानंतर ईशान सापडला. चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) नेण्यात आले. तेथे ईशान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मुलांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक मेहरुण तलाव परिसर व रुग्णालयात पोचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: जादूटोणा प्रकरणाच्या तपासाला वेग; फिरोज शेख यांच्यावरील आरोप मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी फेटाळले

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचा भन्नाट फॉर्म्युला! एवढीच गुंतवणूक करा आणि मिळवा ₹50 लाख

SCROLL FOR NEXT