Jalgaon Crime News
Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

दोन दिवसानंतर‌ जळगावात पुन्हा खून; एकाच महिलेशी प्रेमसंबंधातून खूनाचा संशय

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरात दोन दिवसांपूर्वी खून झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी (२३ जुलै) पुन्हा हरीविठ्ठलनगरच्या भर चौकात एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करुन खून (Crime News) करण्यात आला आहे. घटनेनंतर गुन्हे शाखेचे कर्मचारी विजय पाटील यांनी घरात लपलेल्या संशयिताची गचांडी धरताच हल्लेखोर त्यांच्यावर चाल करुन आला. पोलिस असल्याचे सांगत त्याला ताब्यात घेत रामानंदनगर पोलिसांना (Police) सोपवण्यात आले. एकाच महिलेशी दोघांचे प्रेमप्रकरण असल्याने त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. (Jalgaon Crime News)

जळगाव (Jalgaon) शहरातील गेंदालाल मिल परिसरातील तरुण रहिम शहा ऊर्फ रमा याचा दोन दिवसांपूर्वी जळकी मिल रेल्वे ट्रॅकजवळ खून करण्यात आला होता. या घटनेचे प्रकरण शांत होत नाही; तोवर शनिवारी हरिविठ्ठलनगर, गणपती मंदिर चौकात दिनेश भोई (वय २५) याचा खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास हरिविठ्ठलनगरातील गणपती मंदिर बाजार पट्टा परिसरात लोखंडी रॉड, कोयत्याने दिनेश भोई (वय २५) याच्या डोक्यावर वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री ९.३० च्या सुमारास मृत्यू ओढवला.

पोलिसावरही उगारला रॉड

विठ्ठल ऊर्फ मावली हटकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने दिनेश भेाई या तरुणाची हत्या केल्याचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले. संशयित परिसरातील एका घरातच लपल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी विजय शामराव पाटील यांना मिळाली. विजय पाटील यांनी साध्या कपड्यातच घटनास्थळ गाठले. विठ्ठल ऊर्फ मावली हटकर लपलेल्या घरात शिरताच त्याला मारायला कुणीतरी आले, या समजुतीने तोच लोखंडी रॉड विजय पाटील यांच्यावर उगारला. शिताफीने त्याचा वार चुकवत रॉडसह त्याला धरल्यावर गर्दी गोळा झाली. घटनेची माहिती कळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख घटनास्थळी धडकले संशयिताला ताब्यात घेत रामानंदनगर पोलिसांना सोपवण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT