कोविड  कोविड
महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात सात ठिकाण शासकीय कोविड रुग्णालये बंद

जळगाव जिल्ह्यात सात ठिकाण शासकीय कोविड रुग्णालये बंद

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यात सध्या ॲक्टीव्ह कोविडच्या रुग्णांची संख्या केवळ ४०० आहे. रोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या १५ आहे. यावरून कोरोनाची दुसरी लाट संपल्यागत आहे. यामुळे तालुकास्तरावरील तब्बल सात ठिकाणची शासकीय कोविड रुग्णालये बंद करून त्याठिकाणी नॉन कोविडचे रुग्ण तपासणी सुरू करण्यात आली आहे. (jalgaon-coronavirus-update-sevan-covid-center-closed-in-district)

फेब्रूवारीपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली. यामुळे जिल्ह्यातील तब्बल पंधरा ठिकाणी शासकीय कोविड रुग्णालये सुरू झाली. सोबतच जिल्हा कोविड रुग्णालय, डॉ.उल्हास पाटील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातही कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू झाले होते. दुसऱ्या लाटेतील कोविडच्या रुग्णांची संख्येचा उच्चांक १२ हजारांवर पोचला होता. त्यानंतर कोरोना निर्बंध लावले, संचारबंदी लागली, पुन्हा निर्बंध लावले यामुळे सध्या कोरोना बाधीत ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या आता ४०० आहे. कोरोना ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या घटल्याने तालुकास्तरावरील शासकीय कोविड रुग्णालय बंद करून त्याठिकाणी नॉन कोविड रुग्णांचीही तपासणी करून उपचार सुरू केले आहेत.

सध्या सुरू असलेली शासकीय कोविड रुग्णालय

- जिल्हा कोविड रुग्णालय (जीएमसी)

- डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय

- भुसावळ रुग्णालय

- मोहाडी महिला रुग्णालय

- चाळीसगाव, जामनेर, चोपडा, मुक्ताईनगर रुग्णालय

आकडे बोलतात..

- एकूण बाधीत रुग्ण-- १ लाख ४२ हजार ३७६

- बरे झालेले रुग्ण--१ लाख ३९ हजार ४०३

- सध्या ॲक्टीव्ह रूग्ण--४००

- एकूण मृत्यू--२ हजार ५७३

कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील काही शासकीय कोविड रुग्णालये बंद करून नॉन कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. तिसऱ्या लाटेबाबत तयारी सुरू आहे. बाधीतांची संख्या वाढली तर पुन्हा नॉन कोविड रुग्णालयाचे रुपांतर कोवीड रुग्णालयात केले जाईल.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT