Corona Death Saam tv
महाराष्ट्र

चिंता वाढली; चार महिन्यांनंतर कोरोना मृत्यूची नोंद

चिंता वाढली; चार महिन्यांनंतर कोरोना मृत्यूची नोंद

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कोरोनामुक्‍त जळगाव जिल्‍हा झाल्‍याच्‍या चार महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकाचा मृत्‍यू झाला आहे. चाळीसगाव येथील ६३ वर्षीय इसमाचा (Corona) कोरोनाने मृत्यू झाला असून बुधवारी दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. (jalgaon news corona update Corona's death was recorded four months later)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात फेब्रुवारी २०२२ अखेर कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र निर्माण झाले. त्यानंतर ही सौम्य लाट ओसरली. रुग्ण घटू लागले व मृत्यूही थांबले. परंतु, जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या (Death) मृत्यूनंतर तब्बल चार महिन्यांनी कोरोनामुळे एका मृत्यूची बुधवारी (ता. १५) नोंद झाली. त्यामळे चौथ्या लाटेच्या संभाव्य धोक्याने चिंता वाढवली आहे.

चौथ्या लाटेचा धोका

असे असताना गेल्या आठवडाभरापासून राज्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी (ता. १४) एकाच दिवसांत तब्बल ६ रुग्णांची भर पडून सक्रिय रुग्णसंख्या १६ वर पोचली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: दोन बायका असणाऱ्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीचे विभाजन कसे होते?

Pimple Skin Care: हनुवटीवर सतत मुरूमं येतायेत? मग या ६ सवयी टाळा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र|VIDEO

Raigad Politics: महायुती तुटली; रायगडमधील राजकारण फिरलं,भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का

Maharashtra Live News Update: काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे दोन उमेदवार केले जाहीर

SCROLL FOR NEXT