Jalgaon market 
महाराष्ट्र

दुकाने पूर्णवेळ उघडण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना साकडे

दुकाने पूर्णवेळ उघडण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना साकडे

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : व्‍यवसाय पुर्णपणे सुरू नसल्‍याने आर्थिक अडचण जाणवत आहे. शिवाय व्‍यापार मंदावला असून, दुकाने पुर्णवेळ सुरू करण्याची मागणी होत आहे. मुख्‍य म्‍हणजे जळगाव जिल्‍ह्यातील कोरोना नियंत्रणात आला असून, दुकाने पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी द्यावी; असे साकडे आज कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कँट)ने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घातले आहे. (jalgaon-news-corona-shop-open-full-day-permission-marchant-ajit-pawar)

मागील २० दिवसापासून जळगाव व जिल्ह्यात शहरात कोरोना व डेल्टा संक्रमण पूर्णतः आटोक्यात आहे. मोठ्या प्रमाणात व्यवसाय बंद असल्याने व्यापारी आर्थिक व मानसिक तणावात आहे. आर्थिक भार खूप वाढल्याने अनेक जण आत्महत्या करीत आहे. बंदमुळे दैनंदिन खर्च, पगार, दुकान व गोडावून भाडे, लाइटबील, व्याज, विविध आजारावरील उपचार खर्च सुरू असल्याने खेळते भांडवलही संपले आहे. त्यामुळे व्यापार खूप मंदावला आहे. व्यापार करणे खूप अवघड होत आहे. यामुळे पूर्णवेळ दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोरोना आटोक्‍यात

जिल्ह्यात आता कोरोना संक्रमण परिस्थिती खूप आटोक्यात आहे. मागील २०/२५ दिवसात संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रुग्ण दोन किंवा तीन आढळून येत आहे, मृत्यू नगण्य आहे. लसीकरण समाधान कारक झालेले आहे. प्रत्येक नागरिक विशेष काळजीपूर्वक वागत आहे. आता व्यापार व आर्थिक चक्र वाढणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे सर्व व्यापार, हॉटेल, लॉज, संपूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी.

सहकार्याची अपेक्षा

राज्याचा कठीण परिस्थितीत सर्व व्यापार बंद ठेवून सर्व व्यापारी वर्गाने शासनास संपूर्ण सहकार्य केले आहे. आता आपणाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. कॅटच्या राज्य शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरूषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय शाह, संचालक रामजी सूर्यवंशी, सुभाष कासट, शंकर ललवाणी आदीनीं केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइनेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT