Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: काँग्रेसचे नूतन अध्यक्ष खर्गे हे मोदींना आव्हान देतील; काँग्रेसच्‍या माजी खासदारांचे मत

काँग्रेसचे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे नरेंद्र मोदींना आव्हान देतील; काँग्रेसचे माजी खासदारांचे मत

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : काँग्रेसचे अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची झालेली निवड म्हणजे काँग्रेसला ऊर्जा देणारे असेल. तर दुसरीकडे मल्लिकार्जुन खर्गे हे नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आव्हान देतील; असे मत जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी व्यक्त केले आहे. (Breaking Marathi News)

काँगेस (Congress) अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवडीवर काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सद्यस्थितीत भाजप (BJP) पक्षाला लोक कंटाळलेले आहेत. तर दुसरीकडे इतर विखुरले आहेत. प्रस्थापनात प्रस्थापितांना धक्के दिल्यामुळे त्यांची प्रतिमा काय आहे हे सर्वांसमोर आहे. याचमुळे हे पक्ष तितर बितर झालेले आहेत. काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र विचारसरणीचा पक्ष आहे. ध्येय धोरणावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आगामी काळात काँग्रेसला मोठी संधी आहे व याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कामाला लागले असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.

भाजपला सर्वच ठिकाणी पराभूत करू

राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रेला देशात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे आता काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची झालेली निवड या दोन्ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचा वातावरण आहे. त्या पक्ष संघटन आणि पक्ष बळकटीसाठी मोठा फायदा होणार आहे. याचाच परिणाम म्हणून भाजपला सर्वच ठिकाणी चारही मुंड्या चित करू व आगामी काळात निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यात 14 आमदार तसेच खासदार सुद्धा काँग्रेसचा निवडून येईल; असा विश्वासही माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मामीवर भाच्याचा एकतर्फी जीव जडला, मामाला शेतात अतिबिअर पाजली अन् कायमचा संपवला, असं फुटलं बिंग?

Lockdown : घाबरू नका, देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही, सरकारकडून महत्त्वाची अपडेट

Accident : देव दर्शनाहून येताना काळाचा घाला, पिकअपचा चेंदामेंदा, ८ भाविकांचा जागेवरच मृत्यू

Maharashtra Live News : साताऱ्यात मुबलक पेट्रोल-डीझेल, अफवांवर विश्वास ठेवू नका - देसाई

Pune : पुण्यात खळबळ! लाच घेताना प्रांताधिकारी शिंदे यांना बेड्या, लिपिकही जाळ्यात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT