Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : प्रेमभंगाच्या नैराश्यातून टोकाचा निर्णय; इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवत महाविद्यालय आवारातच घेतला गळफास

Jalgaon News : रविवार असल्याने महाविद्यालयाला सुटी होती. दरम्यान सतीशने सकाळीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मित्रांना आणि त्याच्या जिवलग मैत्रिणीला उद्देशून ‘मला माफ करा’चा स्टेट्स ठेवला होता

Rajesh Sonwane

जळगाव : आई- वडील नसलेल्या अनाथ झालेला तरुण होस्टेलवर राहून महाविद्यलयीन शिक्षण घेत होता. आई- वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या या तरुणाचे एका मुलीवर जीवापाड प्रेम होते. मात्र काही कारणाने दोघांमध्ये बिनसले. मैत्रीण आपल्यापासून दूर गेल्याने प्रेमभंगाच्या नैराश्यातून तरुणाने ‘इन्स्टाग्राम’वर ‘मला माफ करा’ असे स्टेट्स ठेवून आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये घडली. महाविद्यालयाच्या आवारातच या तरुणाने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. 

सतीश कोळी (वय १९) असे मृताचे नाव आहे. जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाजवळील वसतिगृहात सतीश कोळी वास्तव्यास होता. द्वितीय वर्षाच्या कला शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान रविवारी पहाटे महाविद्यालयाच्या दुचाकी वाहनतळ आवारात असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. काही जणांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जिल्‍हापेठ पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला. 


मित्रांसाठी ठेवले स्टेटस  

रविवारी असल्याने महाविद्यालयाला सुटी होती. दरम्यान सतीशने सकाळीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मित्रांना आणि त्याच्या जिवलग मैत्रिणीला उद्देशून ‘मला माफ करा’चा स्टेट्स ठेवला होता. मित्रांनी हा स्टेटस पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्व संपले होते. घडल्या प्रकाराबाबत मित्रांना माहिती मिळताच त्याच्या वर्गमित्रांसह इतर विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात जमा झाले.

अन्‌ मित्रांनाही अश्रू अनावर 

जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिच्यासोबतच संसार करावा, असे स्वप्न तो रंगवत होता. मात्र, दोघांमध्ये बिनसले अन्‌ त्याने टोकाचा निर्णय घेतला असावा, असेही त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. तर सुटीच्या दिवस असल्याने आपल्या आत्महत्येबद्दल कोणाला लवकर कळणार नाही. ज्या कारणास्तव आपण टोकाचा निर्णय घेतोय, असे सतीशने स्टेटसमध्ये म्हटले आहे. आपल्या मित्राचे स्टेट्स पाहून मित्रांच्या डोळ्यात देखील अश्रू अनावर झाले होते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT