महाराष्ट्र

महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामावर चक्‍क ठाणेदारांचे लक्ष

महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामावर चक्‍क ठाणेदारांचे लक्ष

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव- धुळे महामार्गाची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता जीवघेणा बनला आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमधून मार्ग काढतांना वाहनधारकांची अक्षरशा त्रेधा उडत असतांना ठेकेदाराकडून मात्र थातूर मातूर काम करून खड्डे बुजवले जात आहेत. कायदा– सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या मेहूणबारे पोलीसांनी सामाजिक दायित्व निभावत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी यापूर्वीही मदतीचा हात दिला असतांना व आताही खड्डे बुजवले जात असतांना सहाय्यक निरीक्षक पवन देसलेंनी रस्त्यावर जावून खड्डे चांगले बुजवले जात आहे की नाही याची माहिती घेतली. ठाणेदारांच्या या वॉचमुळे किमान खड्डे तरी चांगले बुजवले जातील अशी अपेक्षा आहे. (jalgaon-news-cjalisgaon-dhule-highway-work-wacth-police-officer-work)

चाळीसगाव ते धुळे महामार्गाची गेल्या तीन– चार वर्षापासून अक्षरशा धुळधान उडाली आहे. रोजच अपघात होतात अशी स्थिती आहे आतापर्यंत शेकडो अपघात होवून असंख्यांचा बळी गेला आहे. मात्र त्याकडे महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम मार्गी लागत नसल्याने केवळ डागडुजी सुरू आहे. तीन– चार वर्षात या मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता

रस्त्यांमध्ये इतके खड्डे झालेत की रस्त्यात खड्डा आहे, की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. अपघाताच्या घडणाऱ्या घटना पाहता मेहूणबारे पोलीसांकडून वाहनधारक तसेच नागरीकांची सतत जनजागृती केली जाते. यापूर्वी या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी मेहुणबारे पोलिसांनी खड्डे बुजवण्यास सहकार्य केले होते. मात्र सततच्या पावसामुळे ही वाहुन जावून पुन्हा खड्डे तयार झाले. आताही चाळीसगाव-धुळे रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असतांना ते थातूरमातूर होवू नये; यासाठी मेहूणाबारे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जातीने लक्ष घालत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : सलमान खानचा आर्मी लूक पाहून चाहते उत्सुक! 'मातृभूमी'च्या ट्रेलरची खास झलक प्रदर्शित

Home Cleaning : बाथरूम आणि किचनमधील काळी बुरशी कशी काढायची? जाणून घ्या ७ सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: दोन दिवसांत ऊस दर जाहीर करा, अन्यथा साखर कारखाने बंद पाडू! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा

Accident: स्वामींच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, अपघातात मुंबईतील तिघांचा मृत्यू

फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट; 87 लाख खात्यांत मदत जमा; तुमच्या खात्यात 5 हजार रुपये आले का?

SCROLL FOR NEXT