Concentrators 
महाराष्ट्र

कंत्राटमध्‍ये दाखविले वेगळे अन्‌ दिले दुसरेच कॉन्सन्ट्रेटर

एका कंपनीऐवजी दुसऱ्याच कंपनीचे दिले कॉन्सन्ट्रेटर

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ, बोदवड व यावल ग्रामीण रुग्णालयांत १६ नग, न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात आठ नग, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा येथे प्रत्येकी १६ नग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात आले आहेत. मात्र संबंधित कंत्राटदाराने नमूद केलेल्या कंपनीऐवजी दुसऱ्याचे कंपनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविली आहेत. या प्रकरणाची चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. (jalgaon-news-civil-fraud-Concentrators-paid-by-one-company-instead-of-another)

खासदार रक्षा खडसे यांच्या विकास कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत या खरेदीस मान्यता दिली आहे. गेल्या १८ जूनला जिल्हा रुग्णालय व प्रभंजन ऑटोमोबाईल यांच्यात झालेल्या करारपत्रानुसार ‘डेडाकज सिंगल किंवा ड्यूल आउटलेट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर १० लिटरचे, डीई-२ ए डब्ल्यू’ १२० नग खरेदी करण्यात आले आहेत. एकाची किंमत सव्वा लाख रुपये आहे. संबंधित कंत्राटदारास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले आहेत. वास्तविक पुरवठाधारकांनी मॉडेल क्रमांक बदलून पुरवठा केला आहे.

कंत्राटदाराकडून सांगितली ४२हजार किंमत

भोळे यांनी कंत्राटदार प्रभंजन ऑटोला संपर्क करून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची किंमत विचारली असता ४२ हजार रुपये सांगितली आहे. मग जिल्हा रुग्णालयाने अधिक दराचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी कसे केले, असा प्रश्‍न आहे. जे मॉडेल डीई-२ एडब्ल्यू बदलून दुसरे मॉडेल डीई-२ एसडब्ल्यू हे पुरविले आहे. ही मोठी तफावत खरेदीत आहे. या प्रकरणी चौकशी होऊन सत्य बाहेर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत प्रभंजन ऑटोमोबाईलचे संचालक आदित्य जाखेटे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. तुम्ही माझ्या वकिलाशी संपर्क साधा, ते तुम्हाला पत्र देतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT