Jalgaon news Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू; नागरिक आक्रमक, महापालिकेविरोधात आंदोलन

Jalgaon news : मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेला आठ ते नऊ दिवस उलटून सुद्धा महापालिकेचा कुठल्याही अधिकाऱ्याने कुटुंबीयांची भेट घेतली नाही. यामुळे नागरिक संतप्त झाले

संजय महाजन

जळगाव : मोकाट कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला असून रस्त्यावरून जाणाऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच मागील आठवड्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले असून आज संतप्त नागरिकांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. 

मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढलेला असताना जळगाव महापालिका प्रशासन यावर काही उपाययोजना करत नाही. दरम्यान जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी येथे मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बालकाच्या मृत्यूच्या घटनेला आठ ते नऊ दिवस उलटून सुद्धा महापालिकेचा कुठल्याही अधिकाऱ्याने कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. यामुळे नागरिक संतप्त झाले होते. 

मृत बालकाच्या आई- वडिलांचाही आंदोलनात सहभाग 
घटनेनंतर मनपा प्रशासनाकडून कोणत्याच प्रकरणी दखल घेण्यात आली नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीने महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मयत बालकाचे कुटुंब सुद्धा सहभागी झालं होतं. तर मयत बालकाचे आई- वडील तसेच आजीने यावेळी मोठा आक्रोश करत महापालिकेविरोधात रोष व्यक्त केला. 

आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मयत बालकाच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी सुद्धा वेळ नाही का? या शब्दात नागरिकांनी रोष व्यक्त केला. तर महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर तसेच आयुक्तांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा. तसेच मयत बालकाच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत करावी; अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर मनपाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही व कुटुंबाला मदत मिळाली नाही तर आगामी काळात तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT