महाराष्ट्र

महामार्गावर खड्डे देताहेत मृत्युला आमंत्रण

महामार्गावर खड्डे देताहेत मृत्युला आमंत्रण

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : अत्यंत रहदारीचा असलेल्या महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव ते धुळे पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. या रस्त्यावरील दहिवद फाटा ते चाळीसगावपर्यंत २२ किलोमीटरच्या अंतरावर लहान मोठे खड्डे पडले असून खड्ड्यांची रुंदी एक मीटरपेक्षा जास्त असल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. केवळ खड्डयांमुळेच लहानमोठे अपघात होत असल्याने मृत्‍यूलाच आमंत्रण असल्‍याचा अनुभव या मार्गावर येत आहे. (jalgaon-news-chalisgaon-dhule-highway-Pits-are-inviting-death)

मेहुणबारे ते चाळीसगावपर्यंतच्या १५ किलोमीटरवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सध्या या भागात पाऊस होत असल्याने खड्डे आणखीनच त्रासदायक ठरत आहेत. नागरिकांची वाहने नादुरुस्त होणे, खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या खाली वाहन जाणे, अपघात होणे असे प्रकार जणू रोजच होत आहेत.

खड्ड्यांमुळे होताहेत अपघात

चाळीसगाव- धुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालविताना कुठून चालवावे, असा प्रश्‍न चालकांना पडलेला असतो. या महामार्गावरील खडकीसीम फाट्याजवळ खड्डा चुकविण्याच्या नांदात दुचाकी खड्ड्यात आदळल्याने पती– पत्नी जखमी झाले होते. खड्डे चुकवित आसतांना पंधरा दिवसापुर्वी भोरस फाट्याजवळ मालवाहू कन्टेनेर पलटी झाला होता. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या रस्‍त्यावरील खड्डे खुपच मोठे झाले असून त्यांचा अंदाज देखील येत नसल्याने अपघात होत आहेत.एकूणच हा रस्ता जीवघेणा होत चालल्याने दुरुस्तीची मागणी होत आहे.

खड्याभोवती फिरतोय मृत्यू..

चाळीसगाव ते मेहुणबारे दरम्यान प्रवास करतांना कोणत्या खड्यात दुचाकी पडेल व अपघात होईल या भीतीने वाहन चालवत जावे लागते. या खड्याभोवती जणु काही मृत्यू फिरतोय की काय असाच अनुभव हा वाहन चालवतांना वाहननधारकांना येत आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून या रसत्यावरुन प्रवास करतांना मालवाहतूक करणाऱ्या गाडीच्या मागे चालावे लागत असते तरच आपण आपल्या घरी सुरक्षित पोहचू असे एका दुचाकीस्वार यांनी त्यांचा अनुभव सांगितला हा रस्ता नव्याने होईल तेव्हा होईल. परंतु आज प्रशासनाने हे खड्डे तरी बुजवावे अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Parliamentary Board: भाजपमध्ये भाकरी फिरणार; संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?

Morning tea: चहा पिण्यापूर्वी ही 1 सोपी गोष्ट करा; अॅसिडिटी किंवा जळजळीचा त्रास होणार नाही

Maharashtra News Live Update: इंगळून घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू, प्रशासन सतर्क

धावत्या ईव्ही बंद करणारं अॅप, वाहन चालकांना चिनी अॅपचा धसका

Sunday Horoscope : कोणाच्या नशिबात धनलाभ, तर कोणाला करिअरमध्ये घ्यावी लागेल मोठी काळजी? वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT