Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

Jalgaon News : राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे व कन्नड डेपोची बस समोरासमोर धडकली. या बसमधील तब्बल २५ ते २७ प्रवासी जखमी झाले.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महामंडळाच्या दोन बस समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला असून यात २५ ते २७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जळगावच्या (Jalgaon) कन्नड- चाळीसगाव बायपास हायवेवर आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे व कन्नड डेपोची बस समोरासमोर धडकली. या बसमधील तब्बल २५ ते २७ प्रवासी जखमी झाले. या अपघातातील जखमींना तात्काळ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले. या अपघातात धुळे व कन्नड डेपोच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. (Bus Accident) नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती करू शकली नाही.

जखमी उपचारासाठी दाखल

अपघात झालेल्या दोन्ही बसमध्ये प्रवासी होते. यात एका बसच्या वाहकाकडील साईड दाबली गेल्याने त्या बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Maharashtra News Live Update: राहुल गांधींसह खासदार गांधी स्मृतीस्थळी दाखल

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT