Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: बांधकाम व्यावसायिकाने संपविले जीवन

Jalgaon News : उपचार सुरू असताना रविवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : विषारी द्रावण प्राशन केलेल्या आयोध्यानगरातील ५७ वर्षीय प्रौढाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान )मृत्यु झाला. (Jalgaon) विष घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. एमआयडीसी पोलिसात (Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

कृष्णा निवृत्ती शिंपी (वय-५७) रा.आयोध्या नगर,जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कृष्ण शिंपी हे बांधकाम व्यवसायीक होते. ते पत्नी व दोन मुलांसह अयोध्या नगरातील परिसरात वास्तव्याला होते. ११ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता सुमारास त्यांनी राहत्या घरात विषारी द्रावण सेवन केले. त्यामुळे त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले. यांनतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने (Jalgaon Medical Collage) जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. 

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपचारादरम्यान मृत्यू 

दरम्यान उपचार सुरू असताना रविवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ.नम्रता अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. विषारी औषध घेतल्याचे कारण समोर आलेले नाही. मयताच्या पश्चात आई यमूना, पत्नी आरती, मुलगी सिद्धी, मुलगा अमेय असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT