Jalgaon Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: पत्नीच्या नावे जमीन करण्यासाठी मागितली लाच; तलाठीसह कोतवाल ताब्‍यात

पत्नीच्या नावे जमीन करण्यासाठी मागितली लाच; तलाळीसह कोतवाल ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : शेतकऱ्याच्या हिस्स्यांची जमीन पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच घेणारे (Chalisgaon) बोरखेडा (ता.चाळीसगाव) येथील लाचखोर तलाठीसह कोतवालास लाचलुचपत विभागाच्या पथकाने (Bribe) रंगेहाथ अटक केली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

बोरखेडा (ता. चाळीसगाव) येथील शेतकऱ्याची वडीलोपार्जीत शेती आहे. त्यांच्या नावावर असलेले एक शेत पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी बोरखेडा येथील तलाठी यांच्याकडे प्रकरण टाकले होते. दरम्यान, शेतजमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय ५०, रा. बोरखडो) याने ७ हजाराची मागणी केली. तडजोडी अंती ५ हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, या संदर्भात तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली.

सापळा रचत कारवाई

तक्रारीची पडताळणी करत लाचलुचपत विभागाने (ACB) सापळा रचला. तलाठी ज्ञानेश्वर कोळी यांनी कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण (वय ३ रा. श्रीकृष्णनगर, चाळीसगाव) यांच्यामार्फत २३ मार्चला ५ हजाराची रक्कम स्विकारली. याच वेळी लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यासाठी पुढचे ३ तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार

Gulab Kulfi Recipe : उन्हाळ्यात करा आईस्क्रीम पार्टी, घरीच झटपट बनवा थंडगार 'गुलाब कुल्फी'

BMC News Mumbai: भाजप नगरसेवकाचा मोठा निर्णय; ५ वर्षांचं मानधन, भत्ते महापौरनिधीला देणार, इतर नगरसेवकांची भूमिका काय?

Mangalsutra Designs: 4 ते 5 ग्रॅममध्ये सोन्याच्या मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, लूक दिसेल सुंदर आणि राजेशाही

Maharashtra Live News Update: मालवणीत ३७ किलो गांजा जप्त; ३ जणांना अटक

SCROLL FOR NEXT